सभासदांच्या विश्र्वासामुळे बुलढाणा अर्बन सर्वोच्च शिखरावर - राधेश्याम चांडक -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
३६ वर्षापुर्वी लावलेले रोपटे एका वटवृक्षात रुपांतर झाले,यात सभासदांचा विश्र्वास व कर्मचाऱ्यांची मेहनत व बोर्डाचे नियोजन यामुळे आज ही बॅक सहा राज्यांत यशस्वी काम करीत आहे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक भाईजी यांनी केले.

अर्धापूरातील बुलडाणा अर्बन बँकेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेश्याम चांडक हे होते तर प्रमुख पाहुणे संचालक विनोद मंत्री, नंदकिशोर बाहेती, नंदकिशोर झंवर, आनंदराव देशपांडे, विभागीय व्यवस्थापक रोशन अग्रवाल,भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख,भगवानराव लंगडे, निळकंठराव मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.यावेळी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी म्हणाले कि, बुलढाणा अर्बन बँकेच्या ४६५ शाखा असून, ६३५ गोदाम,तर २३ इंग्रजी शाळा आहेत,या बॅकेची उलाढाल १७५०० करोड रुपये,असून अशीया खंठातील सर्वात मोठी पतसंस्था आहे,संस्थेची मील,वेद विद्यालय, गोरक्षण धाम,बचत गट,७२ कि मी रस्ता बीओटी तत्वावर तयार केला, सभासदांना सोयी उपलब्ध केल्या, शिर्डी,तिरुपती देवस्थान येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. यासह विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात, हे सर्व सभासदांच्या विश्र्वासामुळे शक्य झाले. पण सभासदांना केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ निर्णय घेते असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निळकंठराव मदने यांनी प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक रामचंद्र बोंढारे पाटील यांनी केले,तर आभार सचीन देशपांडे यांनी मानले. यावेळी गोविंद भुतडा,विजय काकडे,अनिल लांडगे,राजू देशमुख,अजीत गट्टाणी,राघवेंद्र बोबडे, राजाराम कांबळे,बाबाराव सरोदे, गजानन कदम, यशवंत गोरे,प्रसाद हापगुंडे, गणेश माने,शंकर हट्टेकर,उतम पवार,गणेश कोंढेकर, राजकुमार मदने,वसंत राऊत सुनिल मोरे, संदीप कदम,राहुल माटे,बालाजी मैड यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी