अर्धापूर। भोकरफाटा येथून दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची पर्स पाठीमागून येणाऱ्या चोरट्यांनी चोरून नेली,या प्रकरणाचा छडा लावीत अर्धापूर पोलीसांनी चोरटा व चोरीचा माल घेणारास अटक केली आहे.
१५ मार्च ला लक्ष्मीबाई विश्वनाथ देवकर रा भोकर या नांदेड येथून तेरवीचा कार्यक्रम करुन भोकरफाटा मार्गे भोकरकडे जातांना पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्याने लक्ष्मीबाई च्या हातातील पर्स साईबाबा मंदिर भोकरफाटा येथून हिसकावून घेऊन फरार झाला, यापर्स मध्ये १ मोबाइल,सोन्याचे गंठन व रोख रक्कम असा एकूण ५२९३७ रुपये असा ऐवज चोरी गेला होता,याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अर्धापूर मार्गावर नेहमी असे प्रकार घडत असल्याने पोलिस विभागीय अधिकारी अर्चना पाटील व पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी या प्रकरणी गांभीर्याने घेऊन तपास केला असता, आरोपी चक्रधर विक्रम हंबर्डे रा कोंठा नांदेड याला व सराफा येथून नागेश संजय रत्नपारखे यास गुप्त माहितीच्या अधिकारात ९ जून ला चौकशीसाठी ताब्यात घेतले,या आरोपीने चोरी रवीवारी कबूली देऊन सोमवारी घटनेतील मुद्देमाल ताब्यात दिला, याप्रकरणी पोलिस विभागीय अधिकारी अर्चना पाटील व पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कपील आगलावे,नरवाडे यांनी तपास केला.