पॅनल प्रमुख मधुकर पाटील दिघे यांची उत्कृष्ट फिल्डिंग
लोहा| राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन हीच महाविकास आघाडी गाव पातळीवर एक होऊन विरोधी भाजपाला ढोबीपिछाड देत आहे. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण, शिवसेनेचे खा. हेमंत भाऊ पाटील, राष्ट्रवादीचे हरीहर भोसीकर यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीची मोट बांधून जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपाला ढोबीपिछाड केले.
त्याच धर्तीवर कारेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची प्रेरणा घेऊन नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आ.मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे नांदेड दक्षीणचे महासचिव मधुकर पाटील दिघे, शिवसेनेचे शेषराव पाटील दिघे , दिगांबर पाटील किरवले, यांच्या नेतृत्वाखाली लोहा तालुक्यातील मौजे कारेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस - शिवसेना - राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन करीत ५ जागेवर दणदणीत विजय मिळवला.
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गावरील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कारेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या ९ जागेसाठी आज दिनांक १७ जून रोजी मतदान झाले या अगोदर ४ जागा बिनविरोध निघाल्या त्यात महाविकास आघाडीची एक जागा बिनविरोध निघाली. दिनांक १७ जून रोजी ९ जागेसाठी निवडणूक झाली त्यात महाविकास आघाडीचे अरुण गणपतराव पाटील दिघे , मल्लिकार्जुन संभाजी देशमुख, गणेश मारोतराव सुर्यवंशी, खंडू साहेबराव मोरे, कपिल सुभाष किरवले हे उमेदवार विजयी झाले तर या अगोदर नारायण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पॅनल प्रमुख मधुकर पाटील दिघे, शेषराव पाटील दिघे ,दिगाबंर पाटील किरवले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. कारेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही मतदारांनी त्रिशंकू असा कौल दिला असुन महाविकास आघाडीच्या पॅनलला सर्वाधिक जागा मिळाल्या असून एक अपक्ष संचालक महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असून कारेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनपदी महाविकास आघाडीचे होतील अशी माहिती मधुकर पाटील दिघे यांनी दिली.