मुदखेड। मौजे धनज ता.मुदखेड येथे डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आल्याने आज दि.२७ जून रोजी डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी धनज गावामध्ये भेट दिली डेंग्यू रुग्ण पाहणी केली व गावा मध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोगाची माहिती दिली, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठ्याचे आठवडयातून एक दिवस घासून पुसून कोरडे करावे व एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व सांगितले.
सध्या पावसाळयाचे दिवस आहेत आपल्या परिसरात खड्डा, नाली व मोरी या ठिकाणी पाणी साचणार याची दक्षता घ्यावी व ते ठिकाण वहाते करावे जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही, हिवताप जनजागरण मोहीमची माहिती डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांनी ग्रामपंचायत कार्यालय धनज येथे नागरिकांना, गंगाधर कोरडे सरपंच प्रतिनिधी, प्रशांत कोकाटे ग्रामविस्तार अधिकारी धनज यांना दिली.
आरोग्य वर्धीनी केंद्र उपकेंद्र मुगट अंतर्गत मौजे धनज येथे डेंग्यू रुग्ण आढळून आल्याने डॉ नीना बोराडे मँडम तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड, डॉ संजय कासराळीकर वैद्यकीय अधिकारी मुगट यांच्या मार्गदर्शनाखाली धनज गावात सोहेल खान आरोग्य कर्मचारी, श्रीमती नंदे पी.एम.आरोग्य सेविका, अनिता खवास आशा कार्यकर्ते यांनी गावामध्ये ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर तपासणी, दुषित ठिकाणी अबेटिंग घरोघरी भेट देऊन करण्यात येत आहे.
जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील किटकसमाहरक अशोक शिंदे, रविंद्र तेलंगे यांनी किटकशास्रीय सर्वेक्षण केले. यावेळी सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) मुदखेड,श्रीमती भालेराव, श्री भोसले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुदखेड, सतिश शिंदे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, राजकुमार साळवे आरोग्य सहाय्यक मुगट आदी कर्मचारी उपस्थित होते.