नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी विद्यापीठ परिसरातील इनडोर हॉलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्धघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
२१ जून जगभरामध्ये योग दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून १३ ते २१ जून दरम्यान एका शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक शिवा बिरकले व सायली मेनन यांनी १३ जूनपासून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना आज रोजी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. याच दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी तंबाखू न खाण्याची शपथ दिली आणि ‘तंबाखू मुक्ती दिन’ पाळण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. अर्जुन भोसले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वैजनाथ अनमुलवाड, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, प्रा. डॉ. अविनाश कदम, प्रा. डॉ. निना गोगटे, प्रा. डॉ. भिमा केंगले, उपकुलसचिव मेघश्याम सोळुंके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. उपकुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, शिवराम लुटे, दुर्गादास धानोरकर, त्रिंबक आव्हाड, सुधाकर शिंदे, अजय काटे, शिवाजी चांदणे, रामदास खोकले, बाबुराव हंबर्डे, पांडुरंग गोवंदे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे कर्मचारी संजयसिंह ठाकूर, सुभाष थेटे, शिवाजी हंबर्डे, के.एम. हसन, रतनसिंह पुजारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.