लोहा| शालांत परीक्षेत पारडी च्याव सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाही आपली गुणवत्ता सिद्ध केली. २२ विद्यार्थ्यांना ९०पेक्षा अधिक गुण आहेत त्या सर्व गुणवणतांचा सत्कार संस्थेचे प्रमुख सुदर्शन शिंदे व सौ जयश्री शिंदे यांनी केला.
पार्डी -लोहा येथील सह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्सच्या शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या सत्कार सोहळ्यासाठी, पालमच्या शिवनेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श तोंडारे ,शाळेचे प्राचार्य श नागेश हिरास,शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ सुप्रिया वाडेवाले, सीबीएसई माध्यमाचे मुख्याध्यापक श नंदकिशोर मेकाले,पर्यवेक्षक काशिनाथ पांचाळ, गुणवंत विद्यार्थी व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सह्याद्री या शाळेने दर्जेदार शिक्षणामुळे आपला नावलौकिक मिळविला आहे.संचालक सुदर्शन शिंदे व सौ जयश्री शिंदे या दाम्पत्य घेत आलेली मेहनत व नवोपक्रम निश्चितच विद्यार्थी पालक यांच्या साठी उपयुक्त ठरणार आहेत. शाळेतून सर्वप्रथम येणारी तनया एरमवार (९९.८०टक्के ) सर्व द्वितीय येणारी सृष्टी पारेकर (९८.८०टक्के ) सर्व तृतीय येणारी सृष्टी गंगापूरे (९८.२० टक्के )त्यासोबतच अंकिता डिकळे, शोएब शेख व राजेश येवले यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थापक आदरणीय श्री सुदर्शन शिंदे सर यांच्या प्रती त्यांच्या या समर्पित वृत्तीचे कौतुक केले. सर्व शिक्षक वर्गाच्या प्रमुख पाहुणे शिवनेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तोंडारे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना आजचा काळ स्पर्धेचा आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करा, जिद्द सोडू नका असे सांगितले. अध्यक्षीय समारो शाळेचे प्राचार्य श्री नागेश हिरास यांनी केलेसंचलन सौ सुप्रिया वाडेवाले आभार व काशिनाथ पांचाळ यांनी मानलेआरंभी स्वागत गीत संजय देशमुख व त्यांचा व आठवीच्या विद्यार्थिनींनी गायिले.