नांदेड| जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्साहात योगाभ्यास करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 7 वा. हा योगाभ्यास वर्ग घेण्यात आला. या कार्याक्रमासाठी योग शिक्षीका श्रीमती नंदीनी व प्रा. सुरेखा घोगरे यांनी योगाभ्यास घेतला.
जिल्हा न्यायाधीश-1 एस. ई. बांगर, अति. जिल्हा न्यायाधीश ए.आर.धामेचा साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज, 4 थे दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती बी.एम.एन.देशमुख मॅडम, यांनी यात सहभाग घेऊन योगाभ्यास केला. योगसाधक श्रीमती नंदीनी व घोगरे यांनी योग दिनाच्या निर्देशानुसार योगाभ्यास घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. गायकवाड यांनी केले तर आभार मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योग शिक्षक विधीज्ञ एच.आर.जाधव, विधीज्ञ कानोटे, नयुमखान पठाण, एस. ए. सौंदनकर, डी. जी. राठोड व न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न - आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.आय.भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्र व आयुष विभागाच्योवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसिकर यांचे हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर योगप्रशिक्षक श्रीमती राणी दळवी यांनी विविध योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगा दिनाचे धडे दिले. तसेच सर्वांनी नियमित योग साधनेवर भर द्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमास जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.जव्वाद खान, शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रेणुकादास मैड, डॉ. कैलास चव्हाण, एल टी तुमोड, रानोळकर, छाया कदम, अपर्णा जाधव, अर्चना भोसले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णकार सदाशिव यांनी केले. आभार प्रदर्शन गायकवाड बालाजी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी परिश्रम घेतले.
तणावमुक्त जगण्यासाठी योग अभ्यासाची गरज--डॉ.सौ. राऊत
बदलत्या काळात आजच्या युवा पिढीला तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग अभ्यासाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका डॉ सौ.एस.एन. राऊत यांनी केल्या. दीपकनगर तरोडा बु.भागातील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव तथा श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस.एन.राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षिका सौ. सीमा परमेश्वर चौरे, योग शिक्षणात राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळविलेल्या कु.हिंदवी परमेश्वर चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सौ.राऊत म्हणाल्या आपले मन व शरीर शुद्ध आणि सक्षम ठेवण्यासाठी दैनंदिनीत योगासाठी वेळ देणे काळाची गरज असल्याचे त्या म्हणून योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात योग शिक्षणात राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या कु.हिंदवी चौरे यांनी विविध योगाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली तर सौ. सीमा चौरे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व या विषयावर माहिती देऊन विद्यार्थ्यांना योगात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शाळेतील श्रीधर पवार,अविनाश इंगोले, प्रल्हाद आयनेले, सुदर्शन कल्याणकर ,बाळकृष्ण राठोड, सुगत मगरे सौ. बुद्धागणा गोखले यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार मगरे यांनी मानले