गविअ केंद्रे यांना उपरती ; सरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण मागे.
नायगांव बा./नांदेड। चक्क कोऱ्या चेकबुक सरपंचांच्या व त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक व ग्रामसभांच्या रजीस्टरवर ग्रामसेवक एन.एस. यरसनवार यांनी सह्या घेतल्याप्रकरणात पाठराखण करणारे नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना उपरती आली असून त्यांनी या प्रकरणात नमते घेत द्विसदसीय चौकशी समिती गठीत केल्याने त्यांच्याच कार्यालयासमोर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी आज २६ जून रोजी सुरु केलेले आमरण उपोषण मेळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच एम.एन.धसाडे यांच्यासह तब्बल ४ ग्रामपंचायत सदस्यांनी मागे घेतले.
मेळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच एम.एन.धसाडे यांच्या ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांनी आपल्या कार्यकाळात विविध योजनानिहाय निधीच्या विनियोगाची कोणतीच माहिती न देता चक्क कोऱ्या चेकबुकवर तसेच,त्यांच्या व सदस्यांच्या प्रत्येक मासिक व ग्रामसभांच्याही कोऱ्याच रजीस्टरवर स्वाक्षरी घेतल्यानंतर याबाबत वेळोवेळी विनंतीनंतरही माहिती देण्याऐवजी स्थानिक प्रस्थापित राजकीय लोकांना हाताशी धरुन जातियद्वेषातून राजकीय दाबदडपण टाकत त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी सोबतच,सरपंचांनी आपण उपस्थित असल्याशिवाय आपल्या यापूर्वी स्वाक्षरी केलेले कोणतेही चेक वठविण्यात येऊ नयेत असे संबंधित बँकांना सूचित करावे अशी विनंती केली होती.
दुसर्या तक्रारीत त्यांच्यासह गंगाधर धारोबा कंदरवाड,माधव बालाजी शिंदे व सौ.भारतबाई अशोक महिपाळे या ग्रामपंचायत सदस्यांनीही त्यांच्या कार्यकाळातील मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्या रजीस्टरवर कोणतेही विषय व इतिवृत्त न देता आपल्या ग्रामसेवकाने स्वाक्षरी घेतलेल्या असल्याने ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेखे,दस्ताऐवज तात्काळ जप्तीसह त्याबाबत व ग्रामपंचायतीला योजनानिहाय प्राप्त निधी व विनियोगाची सक्षम अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी करावी अशी विनंती करुन संबधित ग्रामसेवकाच्या या कृत्यासह ते मुख्यालयी वास्तव्य दूरच आठवड्यातून एखादे-दोन दिवसही ग्रामपंचायतीला येत नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच,अनेक योजनांत लाभार्थींना प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत सोबतच, शासनाच्या विविध योजना माहिती देत नसल्याने त्या प्रचार व प्रसाराअभावी रखडलेल्या आहेत याबाबत माधव केंद्रे यांना गटविकास अधिकारी या नात्याने समक्ष विनंतीनंतरही आपण यावर कार्यवाहीऐवजी दोषी ग्रामसेवकाची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट करुन त्यांच्याच नांवे तक्रार देत तातडीने कार्यवाही करा.
अन्यथा आपल्याच पंचायत समिती कार्यालयासमोर येत्या दि.२६ जून पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले होते. परंतू,नित्याप्रमाणे त्यांनी या तक्रारींची दखल घेतली नसल्याने आज उपोषण सुरु झाल्यानंतर नमते घेत उपरती आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांकडून विस्तार अधिकारी जी.बी. कानोडे यांच्या अध्यक्षतेखाली व कनिष्ठ अभियंता एम.ए.जीरवनकर या दोन सदस्यांची चौकशी समिती गठण करुन त्यांना येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे व चौकशी संपेपर्यंत आर्थिक व्यवहार न करणारे बॅकांना लेखी पत्र दिल्यानंतर सरपंच धसाडे व सदस्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,तालुकाध्यक्ष गजानन चौधरी,जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन चे तालुकाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार,दत्ताराम शिंदे, बालाजी शिंदे,बळवंत शिंदे,श्यामसुंदर शिंदे,किरण वाघमारे, प्रकाश महिपाळे, साहेबराव धसाडे,साहेबराव महिपाळे,तानाजी शेळगांवकर, निळकंठ पाटील,विठ्ठल गवळी, गौत्तम महिपाळे,भिमराव महिपाळे, योगेश शिंदे,किशन महिपाळे आदी सामाजिक कार्यकर्ते,पञकार व मेळगांव येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.