पळसपुर येथील शेतकऱ्याची वीज कोसळून एक गाय ठार -NNL


हिमायतनगर।
तालुक्यातील पळसपुर येथील पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या शिवारात दिगंबर राजना कोमलवार यांनी शेतातील झाडाला गाय बांधली असता वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला यातच विज कडाडून झाडाला बांधून असलेल्या गाय  जागीच ठार  झाल्याची घटना घडली आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

हिमायतनगर तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पळसपुर येथील शेतकरी दिगंबर राजना कोमलवार यांनी आपल्या गाईला दररोजच्या प्रमाणे झोपड्या समोर असलेल्या झाडाला बांधून घराकडे आले होते. सायंकाळी पाऊस सुरू असताना झाडाला बांधलेल्या गायीवर विज कडाडली गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी बदेवाड यांनी केला आहे तर श्वछचेदन पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांनी केले आहे. दुधावळ गाय असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी