किनवट, माधव सूर्यवंशी| राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विजयी झाल्याबद्दल किनवट भाजपाच्या वतीने येथील जिजामाता चौकात आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा जल्लोष साजरा केला.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर व भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त कळताच किनवट तालुका भाजपच्या वतीने आ भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिजामाता चौकात सकाळी 11 वाजता भाजपच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले आहे. या विजयामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला असून, सबका साथ सबका विकास या धोरणामुळे आगामी निवडणुकीतही संबंध महाराष्ट्रात भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपा विधानसभा अध्यक्ष दिनकर चाडावार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
याप्रसंगी भाजपा नेते अनिल तिरमनवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे युवक तालुकाध्यक्ष उमाकांत कराळे जिल्हा सरचिटणीस स्वागत आयनेनीवार, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष आत्माराम मुंडे, शिवा क्यातमवार. अजय चाडावार,शिवा आंधळे,मधुकर अनेलवार,बालाजी धोत्रे, जितेंद्र कुलसंगे, प्रमोद पोहरकर, संतोष श्रीमानवार, जय वर्मा, सुनील चव्हाण गजानन कंचरलावार, बबलू जाधव, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.