हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेल्या अर्धापूर-फुलसांगवी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भर पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना देखील ठेकेदारकडून अर्धवट पुलाचे कामे करण्यास दिरंगाई चालविली जात आहे. याचा फटका काल दि. २१ च्या रात्रीला झालेली दमदार पावसामुळे वाहनधारकांना बसला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे हदगाव-हिमायतनगर रस्त्यावर सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आज सकाळपासून बंद झाला आहे. त्यामुळे दळणवळणाला अडथळा निर्माण झाला असून, हदगाव -हिमायतनगर गाठण्याशी नागरिकांना लांब पाल्याच्या रस्त्याचा वापर करावा लागतो आहे.
मंगळवारी रात्रीला झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूर - फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील आष्टी नजीकचा अर्धवट पुलाजवळील वळण रस्ता वाहून गेल्यामुळे हदगाव - हिमायतनगर मार्ग बुधवारी सकाळपासून बंद झाला आहे. येथील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासन सुरु असताना ठेकेदाराने काम पूर्ण करण्यात दिरंगाई चालविल्यामुळे येथे बनविण्यात आलेला पर्यायी पुलं वाहून गेला आहे. या पुलातील पाइपही आजूबाजूला पुरामुळे सरकली असून, वृत्त लिहीपर्यंत रस्ता बंद असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदरील रस्ता पूर्ववत चालू करण्यासाठी संबंधित ठेकेदार व प्रश्नाने तातडीने प्रयत्न करून नागरिकांची होणारी अडचण दूर करावी. कारण येथील रास्ता बंद असल्यामुळे या मार्गावरून ये - जा करण्यासाठी नागरिकांनी तात्पुरता आष्टी, कांडली, परवा या लांब पाल्याचा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे नागरीकातून रस्त्यावरील पुलाच्या कामे पूर्ण करण्यास चालढकल करणाऱ्या ठेकेदारच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. तसेच या मार्गावर परिसरात असलेल्या अनेक पुलाचेही कामे अर्धवट अवस्थेत आहेत, त्यामुळे आगामी पावसाळ्यात रास्ता बंद होण्याची वेळ येऊ नये रस्ताही ठेकेदारने कायम तोडगा काढून शेतकरी, नागरिक, वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. रस्त्याचे अर्धवट कामे ठेऊन जनतेला वेठीस धरणाऱ्या रुद्राणी कंपनीच्या ठेकदाराच्या कामाची चौकशी करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे असेही अनेकांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात बुधवार 22 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 12.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 87.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार 22 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37.3 (83.3), बिलोली- 0.6 (58.1), मुखेड- 1.4 (105), कंधार-1.5 (107.7), लोहा-1.2 (69.5), हदगाव-28.3 (74.5), भोकर- 3.7 (69.9), देगलूर-0.3 (128), किनवट- 18.5 (100), मुदखेड- 27.3 (130.7), हिमायतनगर-42.2 (96.3), माहूर- 4.5 (89), धर्माबाद- 7.6 (50.3), उमरी- 19 (100.7), अर्धापूर- 17.8 (64.5), नायगाव- 1.0 (51.4) मिलीमीटर आहे.