उस्माननगर येथे पहीली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न -NNL


उस्माननगर।
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा उस्माननगर ता.कंधार येथे चालू शैक्षणिक वर्षातले पहीले केद्रस्तरीय शिक्षण परिषेद उत्साहात साजरे करण्यात आले.

याप्रसंगी  उस्माननगर संकुलाचे केंद्रप्रमुख जयवंतराव काळे हे केद्रस्तरीय शिक्षण परिषद  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर शिक्षण परिषेदेला सुलभक म्हणून साहेबराव शिंदे श्री.वाघमारे ,श्री.सोनसळे, यांच्यासह शिक्षकवृंद, मुख्याध्यापक उपस्थित होते.सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत या वर्षातले पहीली केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रारंभ केला. यावेळी पहीली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत शिक्षण व मुलभूत क्षमता प्राप्त करणे यासाठी सर्व शाळेतील सहशिक्षिका, शिक्षकांनी नियोजनानुसार अध्यापन करावे, तसेच विद्याप्रवेश व सेतू अभ्यासक्रम या. विविध उपक्रमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी .असे सूचित करण्यात आले.

केद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी विद्यार्थी आपल्या जीवनात  जगताना शिक्षणाचा फायदा त्यांच्या जीवनात  झाला पाहिजे ., तसेच शिक्षणाच्या  उपयुक्त व प्रभावी शिकवणी पध्दत महत्वाची आहे.यावर विचार मंथन केले.व उपस्थित शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन केले.सदरील शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वांगेबाई , अनिरूद्ध सिरसाळकर, सोनकांबळे, यांच्यासह शिक्षिका व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी