लोह्याचे भूमिपुत्र भिमानंद महाबळे यांची पीएसआय पदी पदोन्नती -NNL


लोहा|
लोह्याचे भूमिपुत्र भिमानंद हरिहरराव महाबळे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.नांदेड पोलीस मुख्यालयी ते कार्यरत आहेत.

भिमानंद महाबळे हे मार्च १९८७ मध्ये जालना येथे पोलीस दलात सामील झाले .त्यानंतर नांदेड येथे ते बदलून आले.महामार्ग पोलीस, मुख्यालयी डीबी या विभागात त्यांनी काम केले.प्रामाणिकपणा आणि कर्तव्यावर निष्ठा असलेले भिमानंद यांनी  गरिबीतून शिक्षण घेतले.आई चांगुनाबाई या आंबेडकरी चळवळीतील अग्रेसर महिला होत्या तर वडील हरी महाबळे हे स्वातंत्र्य सैनिक होते.भाऊ डी एच महाबळे, एसआरपी मधील गौतम महाबळे, दासू महाबळे,हे भाऊ होते. शीलाबाई सातोरे ही  बहीण तसेच मोठा परिवार आहे.  

पोलीस उपनिरीक्षक या पदावर भिमानंद यांची पदोन्नती झाली .त्याच्या या यशात पत्नी संध्याताई , मुलगी कांचन सोनुले, जावई विशाल सोनुले, मुलगी कोमल महाबळे, धनश्री महाबळे यांचे तसेच गणगोत यांचा योगदान आहे.त्यांच्या पदोन्नती बद्दल लोह्यात तसेच मित्रपरिवार ,नातेवाईक यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी