ओबीसींनी सत्ता हस्तगत करण्यासाठी स्वतंत्र पर्याय उभा करावा-प्रा.डॉ. लक्ष्मण हाके -NNL


नांदेड।
आरक्षणाचे जणक छत्रपती राजर्षी शाहू महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात ओबीसी जनगणना परिषद संपन्न झाली. या ओबीसी जनगणना परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, प्रस्थापित समाजाने आजपर्यंत ओबीसी समाजाचा वापर सत्तेसाठी करून घेतला आहे. परंतु जेव्हा ओबीसींना त्यांचे हक्क देण्याची वेळ आली, त्यावेळी प्रस्थापित समाजाने त्यांच्या प्रयत्नामध्ये प्रामाणिकता दाखविली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम ओबीसींना विचार करून घटनेमध्ये 340 वे कलम समाविष्ट केले आहे. 1995 नंतर मंडल आयोगाच्या अंशतः लागू झालेल्या सवलतीमुळे ओबीसींना शैक्षणिक, नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेमध्ये थोडाफार सहभाग मिळू लागला. 

परंतु या देशातील सरकारच्या खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण या धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील नौकर्‍यांचे प्रमाण 75 टक्क्यांनी कमी झाले. तसेच उच्च आणि तंत्र शिक्षणमध्ये खाजगीकरण झाल्याने ओबीसींचे शिक्षणातील आरक्षण संपुष्टात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशान्वये ओबीसींचा इम्नरिकल डाटा सरकारकडून सादर न झाल्याने ओबीसींचे एकूणच आरक्षण संपुष्टात आले आहे. सत्तेतील प्रस्थापित पक्ष ओबीसींना त्यांचा वाटू देऊ इच्छित नाही. त्यामुळे ओबीसींनी सत्ता हस्तगत करण्यासाठी स्वतंत्र पर्याय उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. लक्ष्मण हाके यांनी केले.

या परिषदेत नांदेड जिल्ह्यातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जात संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पुढील ठराव संमत करण्यात आले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किमान 30 टक्के जागा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष्यांनी द्याव्यात अन्यथा अशा पक्षावर ओबीसी मतदारांनी बहिष्कार टाकावा, ओबीसी जातीचा उल्लेख नसलेल्या प्रगणकाकडे जनगणना करण्यासाठी आल्यास त्याला माहिती न देता त्यास परत पाठवावे, ओबीसी संघटनात्मक युवक संघटना, महिला संघटना सर्व स्तरावर निर्माण करण्यात याव्यात, प्रत्येक जातींनी त्यांच्या महामानवाच्या जयंती कार्यक्रमात ओबीसी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बोलवावे हे ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव आयलवाड, स्वागताध्यक्ष बालाजी ईबितदार, कार्याध्यक्ष नंदकुमार कोसबतवार, होळकरशाहीचे अभ्यासक मुरहरी कुंभारगावे, एस.जी. माचनवार, माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, गोविंदबाबा गौड, लक्ष्मणराव क्षीरसागर, रामचंद्र येईलवाड, गोविंद फेसाटे, राजेश चिटकुलवार, अ‍ॅड. प्रदीप राठोड, रवी बंडेवार, प्रा. श्रीमंत राऊत, प्रा. दिलीप काठोड, दत्ता चापलकर, भुमन्ना आक्केमवाड, डॉ. श्रावण रॅपनवाड, विजय देवडे, जयश्री यशवंतकर, बबनराव वाघमारे, रवी राठोड, परमेश्वर पांचाळ, गोविंदराम सुरनर, साहेबराव बेळे, चंद्रकला चापलकर, सखाराम क्षीरसागर तसेच समाज संघटनेचे नागनाथराव देशमुख, योगेशकुमार जयस्वाल, पी.पी. बंकलवाड, लक्ष्मणराव लिंगापुरे, नागनाथराव चिटकुलवार, आनंद शिनगारे, गणेश घोरपडे, विश्वनाथ कोलंबकर, आर.के. दाभडकर, रामेश्वर गोडसे, इंजि. दिलीप बाऔस्कर, प्रल्हाद गिते, इंजि. संजय अवस्थी, अशोक कुंटूरकर, निळकंठ चोंढे, माणिक रेणके, संग्राम निलपत्रेवार, व्यंकटेश अमृतवार, गणेशराव सूर्यवंशी, गणेश मैलावाड, प्रकाश राठोड, संजय मोगडपल्ले, सतीशचंद्र शिंदे, माणिकराव सगर, नंदकिशोर झोळगे, नारायण पारेकर, नामदेवराव नलावडे, प्रा. योगेश अंबुलगेकर, ओमेश पांचाळ, विवेक चिंचलवाड, महेंद्र देमगुंडे, गोदावरी जंगीलवाड, संतोष साखरे, राजेंद्र पाटील, गिरीश गरूडकर, भगवान संपतवार, व्यंकट चिलवलवार, प्रा. राजेश्वर कुंटूरकर, प्रा. अमोल काळे, गोपाळ बंडे्रवार, स्वप्निल रामगीरवार, बी.बी. कळसकर, सचिन रामदीनवार, गंगाधर होळकर, संदीप जिल्हेवाड, गणेश रापते, सुरेश चंदावाड, नयन राठोड, नैतिक आडे, कृष्णराव चिंतलवाड, गणेश सूर्यवंशी, गिरीष गिते, अंकुश डुबुकवाड इ. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी