बालासाहेब लोणे परिवाराचा सततच्या दातृत्वाचा आदर्श घेवून समाजाच्या वंचित घटकाला मदत करावी -संजय लहानकर


अर्धापुर।
समाजातील आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विषमतेची दरी मिटविण्यासाठी आहेरे वर्गानी नाहीरे वर्गाच्या मदतीसाठी सदैव हात पुढे करायला हवा. या कामी सदैव पुढाकार घेणाऱ्या बालासाहेब लोणे व परिवाराचा सततच्या दातृत्वाचा आदर्श घेवून समाजाच्या वंचित घटकाला मदत करावी असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस ज्येष्ठ नेते मा.संजय देशमुख, लहानकर यांनी केले आहे. 

समाजात आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विषमतेची दरी निर्माण होवू नये नाहीरे वर्गाच्या मदतीसाठी आहिरे वर्गांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. जेणे करुन वंचित व मागास समाज घटक सर्वांसोबत प्रगती साधू शकतील, या कामी सदैव पुढाकार घेणाऱ्या बालासाहेब लोणे व परिवाराचा सततच्या दातृत्वाचा आदर्श आहेरे वर्गानी घ्यावा.असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस मा. संजय देशमुख लहानकर यांनी बालासाहेब लोणे, लहानकर परिवाराच्या वतीने बालासाहेब लोणे यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्रा.शा. चाभरा शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे लाँग रजिस्टर व लेखन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.


चाभरा प्रशालेचे शिक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी बँक लि. जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष,नांदेड जिल्हा परिषद अधिकारी /कर्मचारी जयंती मंडळाचे सचिव, इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा सहकारी शिक्षण पतपेढीचे म.जि.प. नांदेडचे माजी सचिव मा.बालासाहेब लोणे, लहानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय लहानकर बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.किशनराव फोले  हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.सुनील पाटील, ग्रामपंचायत चाभरा येथील सरपंच मा.सदाशिव पाटील चाभरकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस मा.सुभाष लोणे, लहानकर, महाराष्ट्र राज्य पर्यावरण, प्रदुषण व औद्योगिक नियंत्रण विभागाचे  नागपूर उपविभागीय अधिकारी मा.प्रमोद लोणे, लहानकर, ग्रा.पं.लहानचे माजी सरपंच मा.एल.बी.रणखांब,  ग्रा.पं. चाभराचे सदस्य नारायण संगेवार,माजी उपसरपंच बबनदादा बोले, ग्रां.प.लहानचे ग्रामपंचायत सदस्य मा.आनंद लोणे, मा.विजय सावंत, मा.मिलिंद लोणे, मा.नागेश वाहेवळ, शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष मा.गजानन बोले, उपाध्यक्ष मा.आनंदराव मगर, मा.संतोष कऱ्हाळे, मा.संजय देशमुख, मा.बालाजी गुंजकर, पशुवैद्यकीय अधिकारी मा.डॉ.संजय देशमुख, मुख्याध्यापक मा. चंद्रकांत दामेकर, मा.अनुराग आठवले, बारडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाभरा शाळेतील २८८ विद्यार्थ्यांना दर्जेदार लाँग रजिस्टर व इतर लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुअ मा.चंद्रकांत दामेकर यांनी केले तर याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.सुनिल पाटील, पत्रकार मा.सुभाष लोणे, लहानकर, मा.प्रमोद लोणे, लहानकर यांची समयोचित भाषणे झाली.  यावेळी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व ग्रामस्तांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पर्यावरण, प्रदुषण व औद्योगिक नियंत्रण विभागाचे  नागपूर उपविभागीय अधिकारी मा.प्रमोद लोणे, लहानकर यांनी बालासाहेब लोणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा घेवून बक्षिस वितरणासाठी जि.प.प्रा.शा.चाभरा शाळेला ५ हजार रुपयाचे दान दिले.

अध्यक्षीय समारोप करताना हदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.किशनराव फोले म्हणाले की, शाळेतूनच देशाचे भवितव्य घडत असल्यामुळे,समाजातील प्रत्येक दानशूर व्यक्तिने शाळेच्या भौतिक सेवासुविधा पुरविण्यासाठी शाळेसोबत समाज विकासासाठी पुढे यायला हवेच. गावागावात छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी करायला हवी. बालासाहेब लोणे व परिवाराशी माझे फार जूने व परिवर्तनवादी चळवळीचे नाते. या परिवाराने आज १००% विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य वाच्या स्तूत्य घेतला तसेच दरवर्षी अनेक आदिवासी वाडयात शैक्षणिक साहित्य वाटप करतात. 

विविध समाज घटकातील २० विद्यार्थी दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलतात. मागील कोरोना काळात या परिवाराने ५०० कुटुंबांना एक महिनाभर पुरेल संपूर्ण धान्यादी मालाचे वाटप नांदेड मनपाचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते केलेले आहे. मागील सर्व प्रेरणा व विचार बहुजन व परिवर्तनवादी चळवळचे नेते आमचे मित्र बालासाहेब लोणे यांची असते याचा आम्हाला सार्थ अभिमान गर्व आहे. एकजिव व एकरुप असणाऱ्या लोणे,लहानकर परिवाराचे शिक्षण विभागाच्यावतीने अभिनंदन करतो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.राजेश चिटकुलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.बालासाहेब लोणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.प्रा.शाळा चाभरा केंद्र निमगाव ता. हदगाव शाळेतील शिक्षक  मा.बळीराम कदम, मा.अशोक फुलवळकर, मा.विनायक मुलंगे, मा.पांडुरंग चव्हाण, मा.सुनिल कंठाळे, मा.राजेश चिटकुलवार, मा.सौ.प्रतिभा बस्सापूरे, मा.सौ.विजया पिन्नलवार, मा.सौ.रंजिता भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी