भोकर तालुक्यातील सरपंच महिलेसह शिक्षक पतीला 50 हजार लाच प्रकरणी अटक -NNL

शासकीय कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी केली 50 हजाराची मागणी


भोकर/नांदेड।
शासकीय कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी 1लक्ष 30 हजाराची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50 हजाराची लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोकर तालुक्यातील मौजे नांदा (पट्टी म्हैसा), येथील सरपंच महिलेसह शिक्षक पतीला अटक केली आहे, या घटनेनंतर भोकर सह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर व्रत असे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे नांदा (पट्टी म्हैसा), येथील सरपंच श्रीमती सविता आबन्ना दायलवाड, वय 31 वर्षे, व आबन्ना विट्ठल दायलवाड,वय 38 वर्षे,  शिक्षक जिल्हा परिषद शाळा, बेलपाडा, ता.शहापूर, जि. ठाणे रा. ह.मु. फ्लॅट क्र. 201, बिल्डिंग क्र. 03, एलोट्री अपार्टमेंट, शहापूर, जि. ठाणे मूळ रा. मौजे नांदा (पट्टी म्हैसा), ता. भोकर, जि. नांदेड (सरपंच महिलेचे पती ) यांनी तक्रारदार यांनी केलेल्या शासकीय कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी 1,30,000/- रु.  लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50,000/- रु स्विकारली असल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार याने भोकर तालुक्यातील मौजे नांदा (पट्टी म्हैसा), येथे केलेल्या शासकीय कामाचे 13 लक्ष 40,000 रुपयाचे बिल थकीत होते, सदरील बिल काढण्यासाठी सरपंच व शिक्षक पतीने कामाच्या  22% प्रमाणे 2 लक्ष 98,800/- रू लाचेची मागणी केली होती. ताडजोडीअंती 1,30,000/- रुपये देण्याचे ठरले होते, त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन आज रोजी 50,000/-रू लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दि.09/06/2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दि 10 जून रोजी एसीबीच्या पथकाने लाच मागणी पडताळणी दि.10/06/2022 रोजी केली. या पडताळणी काळात सरपंच व शिक्षक पतीने 50 हजाराची लाच स्विकारली याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहाथ पकडून कार्यवाही केली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.

सादर कार्यवाही मा. डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी (एस. ओ.), अशोक व्यंकटराव इप्पर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड (टी.ओ.), श्रीमती मीना बकाल, पोलीस निरीक्षक,  ला.प्र.वि. नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथक श्री अश्विनीकुमार महाजन, पोलीस निरीक्षक, 

पोना सचिन गायकवाड, प्रकाश श्रीरामे, शेख मुक्तार, बालाजी तेलंगे, चापोना निळकंठ यमुनवाड  आणि सर्व ला.प्र.वि.युनिट नांदेड यांनी केली. याबाबत तपास अधिकारी श्रीमती मीना बकाल, पोलीस निरीक्षक,  ला.प्र.वि. नांदेड यांनी नांदेड  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान केले की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी कार्यालय दुरध्वनी -02262 253512, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, मोबाईल नंबर - 7350197197, @ टोल फ्रि क्रं. 1064 या नंबरवर संपर्क करून तक्रार द्यावी असे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी