नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे दि. १ एप्रिल २०२२ रविवार रोजी सकाळी ठिक ९.०५ वाजता संपूर्ण आगाराच्यावतीने महाराष्ट्र स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम ता. व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन मानवंदना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बसस्थानक प्रमुख सौ. वर्षा येरेकर, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संदीप गादेवाड, चार्जमन श्रीनिवास रेणके, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतूक निरीक्षक शेख सलीम, सुधाकर घुमे, विठ्ठल इंगळे, आगार लेखाकार सतीश गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी आगारातील चालक- वाहक, यांत्रिक कामगार, कर्मचार्यांना संबोधित केले.
ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, मागील कोरोना काळात व कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे लालपरीची चाके थांबली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक हानी झाली असून आता प्रवाशी वाहतूक पूर्वपदावर आली असून आपण सर्वांनीच जोमाने कार्याला लागून प्रवाशी बांधवांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा देण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन करुन सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेवटी गुणवंत एच. मिसलवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आगार कर्मचारी राजेश गहीरवार, सिद्धार्थ जोंधळे, राजेंद्र निळेकर, प्रविण दामेरा, राजेश गट्टू, चंद्रकांत पांचाळ, राजेंदरसिंघ चावला, बाबादास पाटोदेकर, सौ. जयप्रीतकौर मदनूरकर, कल्पना कदम, लक्ष्मी पाटोदेकर, सुनीता जोशी, आशा वाघमारे, श्वेता तेलेवार, मीना कदम, मनकर्णा आबादार, मालनबी शे उस्मान, आनंद कदम कोंढेकर, बाबुराव तरपेवाड, केशव टोनगे, विजय गायकवाड, गोविंद सोनटक्के, संदीप देशमुख, विजय सुर्यतळे, शेख अफजल, प्रविण चव्हाण, प्रसाद गोंदगे, सुरेश फुलारी, अविनाश भागवत, पांडूरंग बुरकुले, उत्तम घडलिंगे, मंगेश झाडे, दिपक भंडारे, संतोष पत्रे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.