नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार आज दिनांक 2 मे, 2022 सोमवारी औरंगाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 07512 औरंगाबाद – तिरुपती विशेष गाडी तिचा नियोजित मार्ग बदलून धावणार आहे.
आज सुटणारी गाडी मार्ग बदलून परभणी, नांदेड, निझामाबाद, पगिडीपल्ली, काझीपेत, विजयवाडा, तेनाली या मार्गाने धावेल. हि गाडी नालगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडी, सत्तेनापल्ली, गुंटूर या रेल्वे स्थानका वरून धावणार नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी हि विनंती.
निझामाबाद-पुणे गाडीला परडगाव येथे थांबा मंजूर
दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार गाडी संख्या 11410 निझामाबाद-पुणे गाडीला परडगाव येथे थांबा पुन्हा मंजूर करण्यात आला आहे. हा थांबा तुरंत लागू करण्यात आला आहे. हि गाडी परडगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 05.59 वाजता थांबेल आणि 06.00 वाजता सुटेल.