उस्माननगर, माणिक भिसे। येथील सहशिक्षक वामन लोंढे गुरूजी यांची दुसरी मुलगी कु.पुजा वामन लोंढे हिने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसची पदवी प्राप्त करून मुलींमध्ये आदर्श ठेवला आहे.
उस्माननगर येथील सहशिक्षक वामन लोंढे गुरूजी हे शिस्त प्रिय शिक्षक म्हणून कंधार ,लोहा दोन्ही तालुक्यातील शाळेत परिचय आहे.जिद्द , चिकाटी व परिश्रमातून डॉ.पुजा वामन लोंढे हिने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसची पदवी प्राप्त करून कंधार तालुक्यातील उस्माननगर सारख्या ग्रामीण भागातील मातीत ही वैद्यकीय क्षेत्राचे धडे घेऊन यश मिळविण्याचे धाडस , सामर्थ्य असल्याचे चित्र दाखवून दिले आहे.कु.पुजा लोंढे हिने मिळविलेल्या यशस्वी पदवीने मागासवर्गीय समाजातून डॉक्टर होण्याचा मान मिळाला आहे.
नुकताच नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात तिला पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अतिशय जिद्द चिकाटी आणि परिश्रमातून या कुटूंबाने यश संपादन केले.तिच्या यशाचे आई, वडील, भाऊ,मामा,मामी काका मावशी ,तसेच उस्माननगर परिसरातील नागरिकांनी,वर्ग शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.