नांदेड/हदगाव| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सुरु करण्यात आलेले नाफेडचे (हरभरा) चना खरेदी पोर्टल दि.२३ रोजी अचानकपणे बंद केले आहे. हा प्रकार ऐन खरीप हंगामावर शेतकऱ्यांची हेळसांड करणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने बंद केलेले पोर्टल सुरु करून हरभरा खरेदी करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या सूचने प्रमाने शेतकऱ्यांनी आपल्या हरबऱ्याच्या मालाची खरेदी ५ हजार २३० हमी भाव प्रमाने शासन खरेदी करनार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदी केल्या. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना मेसेज पाठवून आपला माल खरेदीसाठी हरभरा खरेदी केंद्रावर आणावा अश्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी किरायाने वाहन करून गेल्या आठ दिवसापासून हरभरा आणला. मात्र अचानक खरेदी पोर्टल बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्या खाली होत नसल्याने रांगेत उभे आहेत.
अचानक दि.२३ में २०२२ रोजी शासनाचे चणा खरेदीचे पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे भाड्याची वाहने मालाने भरून आणलेले शेतकरी माल खरेदीच्या प्रतीक्षेत रोडवर हरभऱ्याची भरलेली वाहने राञंदिवस जतन करत आहेत. शासनाने अचानक बंद केलेल्या पोर्टलमुळे शेतकर्यांना वाहनाचे रोजचे भाडयाच्या फटका बसता आहे. तसेच बाहेरील बाजारात विक्री केल्यास आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अचानक बंद झालेल्या हरभरा खरेदीमुळे शेतकर्यांची क्रूर चेष्टा शासनाकडून चालवली जात आहे कि...? काय अशी शंका शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यांनतर बाबुराव कदम यांनी हेत मुख्यमंत्र्यांना पंटर पाठवून तातडीने हे चणा खरेदीचे पोर्टल चालू करण्यात यावेत. त्वरीत हातभार खरेदीचा काटा सुरू करून आलेला माल मोजून घ्यावा आणि शेतकरी वर्गाची होत असलेली गैरसोय दूर करावी. जेणेकरून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. कारण अनेक शेतकऱ्यांचा माल ऑनलाईन नोंदणी होऊन पोर्टल बंद पडल्यामुळे पावत्या बाहेर येत नाहीत. तर बहुतांश शेतकऱ्यांना मेसेज येणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाचा हमी भाव मिळावा हे शक्य नसल्यास चालू भावातील आणि हमी भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करावी अशी मागणी बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.