सिरंजनी सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांना "शिवसृष्टी" संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर-NNL

लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण - संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती


नांदेड।
कोरोना सारख्या जागतिक मामारी जखमा सरपंच म्हणून मागील दोन वर्षातील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा. अशा स्वरूपाचे काम रणाऱ्या व पुराणकाळात जीवाचे रान करून गावाच्या भवितव्याचा विचार करत प्रसंगी गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करणार्‍या परंतु न डगमगता आलेल्या संकटाला निधड्या छातीने सामोरे जाऊन सरपंच पदावर असताना कोरोना काळात अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी असे काम केल्याबद्दल शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणार मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार सिरंजनी सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी दिली. 

गावातील मंडळी शहरात जातात किंवा शहरातील मंडळी गावी येतात अशा अनेक लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसाय करत असतात. त्या सर्वांची आवश्यकतेनुसार रॅपिड एंटीजन टेस्ट करणे गावातील पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे गावात घरोघरी जाऊन आशाताईच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी करून त्यांची ऑक्सिजन लेवल तापमान चेक करणे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला कोरोना कीट, विटामिन गोळ्या, सॅनिटायझर, मास, साबण उपलब्ध करून देणे बाहेर गावातून आलेल्या प्रत्येक व्यक्तींना सक्तीने तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस तोरण टाईम करून कोरोनाची चॅन ब्रेक करण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी त्यासाठी गावकऱ्यांचा रोष घेणे.

 सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करणे करुणा मुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोधक त्यांची तपासणी उपचार लसीकरण नियमांचे काटेकोर पालन या पंचसूत्रीचा आधारावर आपलं गाव पुर्ण मुक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सिरंजनी सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांना पुरस्कार दिला जात असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोरोना काळात अनेकांनी हजारो लोकांना जेवण दिलं धान्याच्या किड्स वाटप केल्या गोरगरिबांना कपडे वाटप केले. ज्यावेळी सर्वांनी घरात बसून राहावे अशी परिस्थिती असताना आपण गावाच्या पालकांच्या भूमिकेतून गावभर फिरून कोणाला कसा आळा घालता येईल यासाठी प्रयत्नशील होतात. आजही गावातील लसीकरण त्यासाठी आवश्यक असणारे कॅम्प त्यासंबंधाने असणारे नियोजन या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारी पूर्वक आपण पार पाडत आहात असेही संस्थेच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त महानुभावांचा विशेष कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार असून, त्याबाबतची दिनांक वेळ व स्थळ लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी