हिमायतनगरात मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग, रेल्वेने पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीस अटक -NNL


हिमायतनगर।
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे, अश्या काळात हिमायतनगर शहरातील फुले नगर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात दि 20 च्या मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घुसून जबरीने ओढत नेऊन अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार होण्याच्या तयारीत असलेल्या  आरोपीस मोठ्या शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. 

हिमायतनगर शहरात दि 20 च्या मध्यरात्री महिला घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला. मध्यरात्री झोपेत बेसावध असलेल्या महिलेला जाबरीने बाहेर ओढत नेऊन बलात्कार केला. आणि कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस स्थानकात आरोपी हुसेन मेहमूद शेख यांच्या विरोधात कलम ३७६ (१) ,४५२, ५०६ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करूण सुरुवातीला इस्लापुर, वाशी भागात शोधाशोध केली, त्यानंतर सदर आरोपी इंटरसिटी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्यांचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, एन एस मेंडके, चालक ठाकूर, यांनी रेल्वे स्थानिक गाठून आरोपीला अटक केली.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चोधरी व त्यांचे सहकारी बिट जमादार अशोक सिंगणवाड, पोना. शाम नागरगोजे, अविनाश कुलकर्णी हे करीत आहेत. दरम्यान आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश महोदयांनी त्यास न्यायालयीन कास्टडी सुनावली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी