नांदेड| पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड या शाळेमध्ये महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शाळेचे प्राचार्य डॉ. संदीप कुमार लठ यांनी विशेष पुढाकाराने दि.५/५/२२ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियमित वाढीमुळे उद्भवणारा रोग असून तो शरिराच्या कोणत्याही पेशीमध्ये व अवयवामध्ये होऊ शकतो हे लक्षात घेऊन व महिलांमध्ये याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शिबिरात महिलंची मोफत तपासणी करण्यात येत आहे. यात महिलांमध्ये आढळलेल्या लक्षणांनुसार तपासणी करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये महिलांच्या या आजारासंदर्भात योग्य जागरूकता निर्माण व्हावी,त्याची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय या बद्दल अंकुर सुपरस्पेशालिटी वुमन्स हॉस्पिटल नांदेडच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली कोटगिरे यांनी शाळेतील स्त्री शिक्षकांना व शिक्षकेतर स्त्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य डॉ. संदीप कुमार लठ यांनी प्रथमच शाळेमध्ये अशा प्रकारचे शिबीर आयोजित करून त्याला त्वरित अनुमोदन देऊन सहकार्य करणाऱ्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली कोटगिरे यांचे आभार मानले.