लोहा| ऐंशी -नव्वदच्या दशकात कंधार लोहा तालुक्यातील शेकापचे निष्ठावंत व कंधार, पंचायत समितीचे माजी सदस्य बळीराम पाटील गवते यांच्या स्मृती दिना निमित्ताने पेनूर येथे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन तसेच निराश्रिताना कपडे वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ अशोक गवते पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
बळीराजा शिक्षण प्रसारक मंडळ पेनुरचे संस्थापक पेनूरचे माजी सरपंच, कंधार पसचे माजी सदस्य अशी विविध पदे कै. भाई बळीराम पाटील गवते यांनी भूषविली पेनुर येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात बळीराम पाटील यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्ताने सर्व रोगनिदान शिबीर, निराधार-निराश्रित ममहिलांना साडीचोळीचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक बळीराम पाटील गवते होते. प्राथमिक आरोग्य केंद्र,रुग्णांना फळ वाटप करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कानगुले एस.एस.भालेराव उपस्थित होते.49 नागरिकांच्या मधुमेह, रक्तदाब व इतर रोगांचे निदान करण्यात आले. या शिबिरासाठी डाॅ.पठाण एस. एस. व डाॅ.जोशी पी.पी. यांनी तपासणी केली. निराधार- निराश्रित माता-भगिनींना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाई बळीराम पाटील गवते यांच्यासोबत कार्य केलेले उत्तम राव शिरपूरकर, बालाजी ढेपे, बालाजी आव्हाड माधवराव वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एन राठोड.यांनी केले तर सूत्रसंचालन ए बी जाधव, आभार बिरादार एस.एन यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के टी गवळी, एस एम वाघमारे,श्री कुलकर्णी जी.बी , डाॅ.आर, एस.गवळी, शिरपूरकर व्ही. यु., ढेपे जी.बी, आव्हाड जी.जी. आव्हाड जी.बी श्री शामे डी.एन श्री वडे आदींनी परिश्रम घेतले.