लोहा नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी भाजपचे दता वाले बिनविरोध -NNL


लोहा|
लोहा नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी  बुधवार( ११मे) रोजी विशेष सभा बोलवण्यात आली होती.भाजपा चे दता आपाराव वाले यांचे  एकमेव  नामांकन आल्यामुळे त्याची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली.पीठासीन अधिकारी व उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी ही घोषणा केली. १६वे उपनगराध्यक्ष म्हणून त्याची ही  निवड झाली .

लोहा नगर पालिकेत भाजप -१३ - व नगराध्यक्ष तर काँग्रेस -४असे पक्षीय बलाबल आहे.शरद पवार यांना मार्च महिन्यात  पदावरून दूर केल्या नंतर उपनगराध्यक्ष पद रिक्त होते.बुधवार ११ मे रोजी निवडणूक घेण्यात  आली.पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकीची   विशेष सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली. 

जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बंद लिफाफा पाठविला त्यात दता आप्पाराव वाले यांचे नाव होते. त्यांनी एकमेव अर्ज दाखल केला .पीठासीन अधिकारी श्री मंडलिक यांनी निर्धारितवेळेत एकच अर्ज आल्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर  त्याच्या नावाची घोषणा केली. सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ पेंटे यांनी सहकार्य केले. दता वाले यांच्या अर्धांगिनी  पाच वर्षे  पंचायत समितीच्या सदस्य होत्या. ते मूळचे आडगाव येथील पण अनेक वर्षां पासून त्याच्या वडिलोपार्जित लोह्यात स्थायिक आहेत.इतर भागातील पहिलेच उपनगराध्यक्ष म्हणून त्याची नोंद  झाली.  

कल्याणराव सुर्यवंशी ( ५वर्ष), संभाजीराव धुतमल (५ वर्ष) , लक्ष्मणराव हामदे, रामभाऊ चनावार, किरण सावकार वटटमवार(२ वेळ) , गजानन सूर्यवंशी,( वेळा२) रामराव सूर्यवंशी, किरण पवार, छत्रपती धुतमल, सोनू संगेवार ( ५वर्ष), केशवराव मुकदम, शरद पाटील यांच्या नामोवल्लीत आता १६वे उपनगराध्यक्ष म्हणून दता आप्पाराव वाले यांचा समावेश झाला आहे . निवड बैठकीस नगराध्यक्ष गजानन  सुर्यवंशी , भाजप  व काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे शरद पवार  व बालाजी शेळके हे नगरसेवक अनुउपस्थित होते. निवडी साठी गटनेते करीम शेख यांनी व्हीप बजवला होता. त्यांना यावेळीही हुलकावणी बसली. नंतर त्याच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी