सुखप्रीतकौरच्या हत्येचे नांदेड शहरात निषेध; गुरुद्वारा समोर श्रद्धांजलि वाहिली -NNL


नांदेड|
औरंगाबाद येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतील बळी कुमारी सुखप्रीतकौर (कशिश) प्रीतपालसिंघ ग्रंथी या दिवंगत मुलीला गुरुद्वारा समोरील संतबाबा हजुरासिंघजी चौक येथे सामूहिक रित्या श्रद्धांजलि वाहिन्यात आली. सुखप्रीतकौरच्या प्रतिमेस पुष अर्पण करून आणि मेणबत्या पेटवून मुलीं, महिला आणि सर्वपक्षीय नेत्यांनी वरील घटनेचा निषेध केला. 


मंगळवारी सायंकाळी 7.30 दरम्यान (ता. 24) श्रद्धांजलि सभा घेण्यात आली. या वेळी महानगर पालिकेच्या नगरसेविका व माजी सभापति श्रीमती प्रकाशकौर सुरजीतसिंघ खालसा, भारतीय जनता पक्ष महानगर अध्यक्ष प्रवीण साले, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रवींद्रसिंघ बुंगाई, श्री अरविन्द भारतीया, एडवोकेट अमरीकसिंघ वासरीकर, अनिलसिंह हजारी, राजिंदरसिंघ पुजारी, शरण सिंघ सोढी, गुरचरनसिंघ चंदन, लालसिंघ सपुरे, स. सुरजीतसिंघ खालसा, जीतसिंघ दुकानदार, जसबीरसिंघ धूपिया, पूनमकौर धूपिया, तेजिंदर सिंघ धूपिया, स. लड्डूसिंघ काटगर, हरभजनसिंघ पुजारी, गुरप्रीतसिंघ सोखी, रविंदरसिंघ हज़ूरिया, तेजवंत सिंघ खेड, बलजीतसिंघ, भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी  सह मोठ्या संख्येत सर्वधर्मीय लोकांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सिख आघाडीचे जिल्हा अध्यक्ष स. किरपालसिंघ हजुरीया यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी केले. यावेळी श्रीमती प्रकाशकौर खालसा यांनी मागणी केली की एका निष्पाप मुलीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्यावर कायद्यातील सर्वात मोठी सजा ठोठाविण्यात यावी. पूनमकौर धूपिया यांनीही मारेकऱ्याला फाशी देण्याची मागणी केली. तर प्रवीण साले, लड्डूसिंघ महाजन, रविंद्रसिंघ बुंगाई, अरविन्द भारतीया, एडवोकेट अमरीकसिंघ वासरीकर, अनिलसिंह हजारी आदींनी श्रद्धांजलि वाहणारे भाषण केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी