नांदेड| व्हाट्सअप तथा फेसबुक अशा सोशल मीडियावर आॅनलाईन पद्धतीने अभिव्यक्त होणाऱ्या कवी आणि कवयित्रींची विद्रोही काव्य मैफिल २१ मे रोजी रंगणार आहे. ही विद्रोही काव्य मैफिल काव्य पौर्णिमा म्हणून साजरी केली जाणार असून अध्यक्षस्थानी येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष, ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे हे राहणार आहेत तर अतिथी कवी म्हणून राज्यभरातून प्रमोद कांबळे, प्रशांत वंजारे, जनार्दन मोहिते, सज्जन बरडे, प्रेम हनवते, शलिक जिल्हेकर, सुनंदा बोदिले, सरिता सातारडे, पूजा ढवळे, शुभांगी जुमळे, संजय गोडघाटे, किरण पतंगे, संजय मोखडे, देवकांत वंजारे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
शहरातील कुसुम सभागृहात येत्या २१ मे रोजी महान आंबेडकरी जलसाकार वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सत्यशोधक फाऊंडेशन आणि मानव विकास संशोधन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनपूर्व सत्रात या विद्रोही काव्य पौर्णिमेस प्रारंभ होणार आहे. या कविसंमेलनात कवी कवयित्री सहभागी होणार असून शहर तथा जिल्हाभरातील स्थानिक विद्रोही कवी कवयित्री यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बालाजी इबितदार, जी.पी. मिसाळे, प्रज्ञाधर ढवळे, राज गोडबोले, कोंडदेव हटकर, एन. डी. गवळे, प्रा. कैलास राठोड, प्रफुल्ल सावंत, डॉ. सी. के. हरनावळे, एन.डी. पंडित, बाबुराव कसबे, प्रभू ढवळे आदींनी केले आहे.
वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणारे हे कविसंमेलन वामनदादांचे भीमकाव्य लक्षात घेता आजच्या उजेडाच्या हल्ल्यावरील कविता, सर्व गतिप्रक्रिया गिळायला लागलेल्या मूलतत्त्ववादाच्या मगरीवर, गगनभेदी महागाईवर आणि धर्मनिरपेक्षतेच्या आक्रंदनावर तसेच परिवर्तनाभोवती धिंगाणा घालणाऱ्या धर्मांधतेवर आधारित होणार आहे. या ऐतिहासिक कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी नितीन एंगडे, डॉ. राम वनंजे, रमेश कसबे, संजय जाधव, ज्ञानोबा दुधमल, राहुल गवारे, एम. एस. गव्हाणे, आर. पी. झगडे, अशोक मल्हारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, शंकर गच्चे कैलास धुतराज, प्रशांत गवळे, रुपाली वागरे वैद्य, बाबुराव पाईकराव, रणजीत गोणारकर, थोरात बंधू, आ.ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे आदी परिश्रम घेत आहेत.