नांदेडमध्ये ऑनलाईन पार्सलवरील पाकिस्ताननगर पत्त्याने खळबळ -NNL

गैरसमजुतीतून पाकिजानगर ऐवजी लिहिले गेले पाकिस्ताननगर,


नांदेड।
शहरातील एका व्यक्तीने मागविलेल्या ऑनलाईन पार्सलवर  पाकिस्ताननगर अश्या प्रकारच्या लिहिलेल्या पत्त्याने एकच खळबळ उडाली असून, नांदेड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितलं

कपडे कुरिअरने मागवणाऱ्या शेख खलील या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. त्यांनंतर हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शेख खलील या तरुणाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याने मोबाइलमधून व्हाइस रेकॉर्ड करून संबंधित कंपनीला त्याचा पत्ता त्या अॅपवर पाठवला होता. कंपनीने शेख खलील याच्या नावाखाली पाकिजानगर या नावाचा पत्ता लिहिण्याऐवजी पाकिस्ताननगर, नांदेड असा लिहिला. आणि हे कंपनीने गैरसमजातून टाकल्याचे स्पष्ट झाले.

नांदेड शहरात किंवा जिल्ह्यात पाकिस्ताननगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेड शहरात देगलूर नाका भागात पाकिजानगर ही वस्ती आहे. हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितलं. सोशल मीडियावर अशा कुठल्याही अफवा किंवा जाती-धर्मात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट टाकू नये. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक धबडगे यांनी मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी