निरक्षर नागरीकांची लुबाडणुक करुन गैरकारभार करणारी किनवट येथील बॅक एजंसी ब्लॉक -NNL


किनवट।
मराठवाडा ग्रामिण बॅकेच्या व्यवस्थापकांनी दिनांक ११ मे रोजी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे किनवट शहरातील तहसिल परिसरात मराठवाडा गामिण बॅकेची बि.सी एजंट वकरंगी या कंपनीमार्फत चालवणा-या सय्यद अझहर अकबर रा. बाबा रमझान गल्ली ता किनवट जि नांदेड यांचे गैरकारभारामुळे त्यांची एजंसी बंद केली असुन त्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठाकडे केली आहे.

मराठवाडा ग्रामिण बॅक किनवट शाखेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी एका प्रेस नोटव्दारे माध्यमांना सय्यद अझहर अकबर रा. बाबा रमझान गल्ली ता किनवट जि नांदेड यांच्या गैरकारभारामुळे त्याची बॅक एजंसी ब्लॉक करण्यात आल्याची माहिती दिली असुन, या संदर्भात चौकशी केली असता असे निदर्शनास आले आहे कि, सदर एजंट हा निरक्षर नागरीकांची लुबाडणुक करुन त्यांच्या खात्यातुन त्यांच्या परवानगी शिवाय व्यवहार करत असे तर मराठवाडा ग्रामिण बॅकेने प्रसिध्द केलेल्या प्रेस नोट मध्ये नमुद करण्यात आले आहे .

सदर इसम हा विविध योजनांच्या फॉर्मवर खोट्या स्वाक्ष-या करुन स्वतःचे टार्गेट पुर्ण करण्याकरिता संशयास्पद व्यवहार करत असे व त्याची बॅकेच्या ग्राहकांशी वर्तवणुक अत्यंत उध्दट स्वरुपाची होती. त्यामुळे त्याचा आय डी ब्लॉक करण्यात आला आहे तरी तहसिल परिसरातील त्याच्या ए.टी.एम व बॅकींग संदर्भातील तत्सम सेवा घेण्याकरिता त्याच्याशी कुणीही व्यवहार करुन नये त्या करिता बॅक शाखा जबाबदार राहणार नाही. असे प्रेस नोटव्दारे भविष्यातील धोका पाहता बॅकेने नागरीकांना सुचित केले आहे. 

वाढलेल्या लोकसंख्ये मुळे बॅक खातेधारकांची संख्या हि प्रचंड वाढली आहे त्यामुळे विविध बॅकांनी खाजगी व्यक्ती मार्फत ए.एस.सी सेंटरव्दारे व्यवहार व्हावे अशी व्यवस्था केली आहे ज्यामुळे बॅकेच्या खातेधारकांना लांबलचक रांगे मध्ये थांबण्याची गरज भासु नये परंतु याचा दुरुपयोग काही व्यक्तींनी स्वतःच्या लाभा करिता करण्यात सुरवात केल्याने खातेधारकांच्या वाढलेल्या तक्रारीवरुन किनवट येथिल मराठवाडा ग्रामिण बॅकेच्या व्यवस्थापकांनी असे कठोर पाऊल उचलले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी