पेनूर येथे १२लक्ष रुपयांचा निधी
लोहा। राज्य सरकारने इ.स . २००० नंतरचे गायरान पट्टे नियमित करावेत यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू .भूमिहीनाना जमीन भेटली पाहिजेत तसेच पारधी समाजाच्या बाबत सामाजिक दृष्टिकोन बदलला पाहिजे असे लागून उपेक्षित घटकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे तसेच पेनूर येथील सभागृहासाठी १२लक्ष रुपयांचा निधी देऊ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लोहा तालुक्यातील पेनूर येथे रिपब्लिकन हक्क परिषद व सार्वजनिक बुद्ध जयंती च्या वतीने चंद्रकांत एडके व देवानंद एडके व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित बुद्ध जयंती निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाई चे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे,कंधार उपविभागीय दंडाधिकारी डॉ शरद मंडलिक विभागीय सामाजिक सहायक आयुक्त देवशेट्टे, सामाजिक न्याय सहायक उपयुक्त तेजस माळवदकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार अशोक मोकले,सोनखेडचे सपोनि भोसले, रिपाई चे कपिल सरोदे, रिपाई जिल्हा सरचिटणीस बालाजी धनसडे, तालुकाध्यक्ष सुरेश महाबळे, विश्वनाथ कांबळे, गावचे आजी माजी सरपंच मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खास आपल्या शैलीतील कवितेने केली.राज्य सरकारने १४एप्रिल १९९० पूर्वीचे सर्व गायरान पट्टे कायम केले पण त्यानंतर गायरान ,वतन जमिनी, वन जमिनी बाबत मात्र धोरणात्मक निर्णय घेतला नाही.त्यामुळे इस व २००० पर्यंतचे पट्टे कायम करावेत यासाठी राज्यसरकार कडे पाठ पुरावा करू असे सांगून त्यांनी पारधी समाजाच्या अनुसंगाणे आहवान केले.खासदार निधीतून पेनूर येथे सभागृहासाठी १२लक्ष रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण झाला पाहिजे तथागत भगवान बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला त्याची आज गरज आहे असे मार्गदर्शन केले.
यावेळी लातूर विभागीय सामाजिक न्याय विभागाचे आयुक देवशेट्टे, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे कपिल सरोदे ,यांची भाषणे झाली.आरंभी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक चंद्रकांत एडके यांनी केले संचलन अमोल गोणारकर यांनी तर आभार मिलिंद एडके यांनी केले