खा.चिखलीकरांचे मध्यरात्री क्रीडांगणावर आगमन खेळाडूंमध्ये उत्साह संचारला -NNL


कंधार, सचिन मोरे।
क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचला होता अटीतटीचा सामना खेळाडूंमध्ये रोमांच निर्माण झाला होता ,प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका  चुकवणारा सामना क्रीडांगणात चालू असताना खासदार चिखलीकर मध्यरात्री एक वाजता क्रीडांगणावर पोहोचले व खेळाडूंसह प्रेक्षकांनी एकच आनंद उत्सव केला.

मराठवाड्यात प्रथमच कंधार येथे दिवस-रात्र प्रकाश  झोतात सामन्याचे आयोजन खासदार प्रताप पाटील चिखलीकर व लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नावे जिल्हापरिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रताप पाटील चिखलीकर व खासदार सुधाकर शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या हस्ते क्रिडांगणाचे पूजन करून या क्रीडा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली  दिनांक १५ मे पासून चालू झालेल्या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेतील  सहाव्या दिवशी सोळा संघांनी सहभाग नोंदवत आठ सामने खेळवले गेले.


दि २० रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास अर्धापूर इलेव्हन क्रिकेट क्लब विरुद्ध  सूर्या देवणी क्रिकेट क्लब देवनी यांच्यात सामना चालू असताना शेवटच्या चटकारात अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली होती,प्रक्षेक स्वास रोखून सामना पाहत होते. तेंव्हा क्रीडांनावर नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अचानक उपस्थितीत झाल्याने खेळाडू सह प्रेक्षकांत आनंद संचारला दोन्ही संघात शेवटच्या चेंडू पर्यन्त सामना रंगला शेवटी अर्धापुर ईलेव्हन ने सामना जिंकला विजयी संघातील सामनावीर सोमेश कानोटे यांना स्मृतिचिन्ह खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आला.

 यावेळी उपनगराध्यक्ष जफर बाउद्दीन,माजी नगरसेवक कृष्णा पापींनवार, माजी नगरसेवक जफर उल्ला खान,प्रल्हाद उमाटे,भजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,युवमोर्च्या जिल्हाउपाध्य निलेश गौर,समीर चाऊस,रमण आवाळे,शेख असिफ,सय्यद मुजाहिद,जमीर लाला,शेख असिफ ,अड सागर डोंगरजकर ,रवी संगेवार,रामदास बाबळे,शुभम संगनवार,सुमित गोरे,समीर खादीम यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी