डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा घुंगराळ्यात जल्लोषात साजरा
घुंगराळा| भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व कर्तत्व प्रेरणादायी असून ते प्रत्येकांनी आत्मसात करून घेत जोपासावेत असे आवाहन सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांनी व्यक्त केले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मौजे घुंगराळा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी तथागत सिद्धार्थ गौत्तम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन तसेच, विश्वरत्न,प.पु. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना वंदन करुन पंचशील ध्वजारोहण घुंगराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.राधाबाई जोगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,उपसरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,व्यंकटराव पाटील सुगावे,काँग्रेसचे युवानेते पंडित पाटील सुगावे,ग्रा.पं.सदस्या किशनाबाई कळकटवाड, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड,मोहनराव जोगेवार,संभाजी तुरटवाड, बालाजी तुरटवाड,पत्रकार माधव पवार,मिलींद बच्चाव, धम्मदिप भद्रे,माजी उपसरपंच शिवाजी ढगे,यशवंत ढगे, कंचलवाड,दिगांबर गंगासागरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना सरपंच श्रीमती जोगेवार म्हणाल्या की,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी सरपंचपदावर विराजमान असून त्यांच्याच कार्य व कर्तत्वाचा वारसा जोपासीत येथील प्रत्येक समाजघटकांना न्याय देण्यासाठी व येथील मागासवर्गीय वस्ती तसेच, गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कर्तव्यतत्पर व कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी रोहित रमेश आढाव, निलेश हनमंते आदी विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबता हनमंते यांनी केले. सकाळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मान्यवरांचे भाषणे झाली व सायंकाळी गांवातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी एस.के.गजभारे,युवक काँग्रेस नायगांव विधानसभा सरचिटणीस देविदास सुगावे, गणपत गजभारे, हौसाजी गजभारे,पोचिराम गजभारे, रामराव बोंडले,पांडुरंग पट्टेकर, विठ्ठल सुर्यवंशी,अमृत गजभारे, रमेश आढाव, बळवंत बोंडले, प्रकाश महिपाळे,प्रफुल्लकुमार भवरे,विलास ढगे,चंद्रसेन गंगासागरे,राजेंद्र सोनसळे, भाऊराव पाटील ढगे,संभाजी सुर्यवंशी,बबन ढवळे आदींसह स्थानिक व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका,ग्रामस्थ, लहान-थोर बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम गजभारे,दिपक गजभारे, धम्मपाल ढवळे,सिद्धोधन पट्टेकर,सचिन गजभारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा येथे जल्लोषात दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम तसेच,गांवातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक आदी अनेक कार्यक्रमांतून साजरा करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उत्तम गजभारे यांनी दिली.