नविन नांदेड| भायेगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने १५ व्या वित आयोगातुन दलीत वस्ती येथे पेवरचे काम,अंगणवाडी मैदानात पेवर ब्लँक चे काम तसेच जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधकाम , ग्रामपंचायत कार्यालय येथे लाईट फिंटीग पंखे बसविण्यात आले आहेत, तर गावातील अनेक रस्त्यांचे काम चालु असुन आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर चालू असल्याचे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी सांगितले असून आगामी चार वर्षांचा काळात अनेक विकासकामे करण्याचा संकल्प आहे.
उर्वरित चार वर्षात आमच्या ग्रामपंचायत च्या वतीने गावातील काही शिल्लक राहीलेले काम पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे सर्व काम करण्यासाठी आम्हाला खासदार हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आणा हंबर्डे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम करत आहोत. आणि हे काम करण्यासाठी आम्हाला गावातील गावकरी बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
तसेच आमचे सहकारी सौ.सविता बालाजी पाटील भायेगावकर सरपंच ,उपसरपंच बालाजी पाटील कोल्हे सदस्य शंकर पाटील खोसडे, शिवाजी खोसडे, साईनाथ यन्नावार, भाग्यश्री यन्नावार, गौतम भालेराव,व ग्रामविकास अधिकारी वाकोरे व माझा एक संकल्प आहे की आमच्या पाच वर्षांत गावातील सर्व काम करुन माझं गाव आदर्श गाव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी सांगितले.