पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या नावाला व कार्याला शोभेल अशी ‘पद्मश्री’ इन्स्टिट्युट उभारा -खा. शरद पवार -NNL

पद्मश्री इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे भुमिपूजन


नांदेड|
पद्मश्री श्यामरावजी कदम यांनी सहकार क्षेत्रामध्ये व इतर क्षेत्रामध्ये समाज उपयोगी भरीव कार्य केलेले आहे. त्यांचे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या नावाला व कार्याला शोभेल असे पद्मश्री इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर उभे करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांनी केले.

नांदेड येथे पद्मश्री इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या भुमिपूजन खा. शरद पवार यांच्या हस्ते दि. 14 मे रोजी संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पद्मश्री इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील कदम यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमजीएचे सचिव अंकुशराव कदम, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. फौजिया खान, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. मोहन हंबर्डे, महापौर सौ. जयश्री पावडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे, लातूर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, माजी खा. व्यंकटेश काब्दे, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजप महानगरप्रमुख प्रविण साले, अखिल भारतीय महानुभव पंथाचे जिल्हाध्यक्ष कानेराज बुवा, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना आसान अशरफ, फारूख जमीनदार आदी जणांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खा.शरद पवार म्हणाले की, पद्मश्री श्यामराव कदम यांनी सहकार व इतर क्षेत्रामध्ये धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील या व्यक्तीसारखे उच्च समाजउपयोगी कार्य सहकार क्षेत्रामध्ये केले आहे. डॉ.सुनील कदम, डॉ. संजय कदम व त्यांच्या संचालक मंडळाने पद्मश्री श्यामराव कदम यांच्या नावाने पद्मश्री इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या उच्च दर्जाच्या वैद्यकीय प्रतिष्ठाणाची उभारणी करण्याचा जो संकल्प केला आहे. त्याचे भुमिपूजन माझ्या हस्ते आज झाले आहे. ही संस्था पद्मश्री यांच्या नावाला व कार्याला साजेल अशी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाची जोड लाऊन एक लोकाभिमुख वैद्यकीय प्रतिष्ठाण निर्माण करावे. संस्थेच्या उभारणीमध्ये माझे व माझ्या सहकार्यांचे पूर्ण सहकार्य राहील असेही पवार म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले की, याठिकाणी अत्याधुनिक दवाखान्यासोबत वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. संजय कदम यांनी दवाखान्याची विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी माजी अधीक्षक अभियंता या.रा. जाधव, संचालक डॉ. हंसराज वैद्य, सुभाषराव कदम, डॉ. सत्यवान जाधव, डॉ. आशा जाधव, डॉ. प्रकाश पाटील, सौ. निशा पाटील, डॉ. सौ. शीला कदम, सौ. स्मिता कदम, सौ. डॉ. अरूणा देशमुख, डॉ. तेजस्विनी बोकारे, डॉ. अशोकराव कदम, डॉ. संजुकूमार कळकेकर यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर व प्रतिष्ठीत नागरीक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुधाकर बोकारे यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी