तालुकाध्यक्षपदी कुमारी प्रतिक्षा घोरबंड तर सचिवपदी सतीश भराडे यांची निवड
नांदेड/हिमायतनगर। दिनांक 28 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिमायतनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारणी करिता बैठक घेण्यात आली सदर बैठकीसाठी जिल्हास्तरावरून सल्लागार अफरोज सौदागर व संघटक कृष्णा चौधरी व श्रीमती चैताली जाधव उपस्थित होते.
सदर बैठकीत जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संघटना बळकट करण्यासाठी व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय आणि प्रलंबित मागण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आमचे हक्क मिळविण्याकरिता आम्ही हिमायतनगर तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी खंबीरपणे जिल्हा संघटनेच्या सोबत पूर्ण ताकतीने उभे राहू असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेची हिमायतनगर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये हिमायतनगर तालुका अध्यक्ष कुमारी प्रतिक्षा घोरबंड व सचिव पदी एस डी भराडे उपाध्यक्ष श्रीमती वंदना वाळके व श्रीमती उज्वला तुंगेवाड व श्रीमती श्रीवास्तव सहसचिवपदी श्रीमती शेवाळकर पी डी व श्रीमती सुनीता गवले व श्रीमती मीरा तिरवड व श्रीमती सोनाली अल्लुरे व कुमारी चित्रलेखा व कोषाध्यक्षपदी श्री सचिन शरद राव देशमुख व संघटक पदी श्री चव्हाण व श्री वाघमारे व श्रीमती मिरवाड व श्रीमती मीरा बेले संपर्क प्रमुख पदी श्रीमती वागतकर व श्रीमती राणी पवार व श्रीमती राचावार व श्री इंगोले व श्री भोसले तर सदस्यपदी श्री कृष्णा चौधरी व अफरोज सौदागर आदींची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रतील सर्व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अफरोज सौदागर यांनी केले तर बैठकीचे आभार श्री चौधरी के पी यांनी मानले.