विधवा व आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार व भव्य ग्रंथतुलने दीपक कदम यांचा वाढदिवस साजरा -NNL


नांदेड।
आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य ग्रंथ तुले मध्ये शेकडो ग्रंथ विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी प्रधान केले व अत्यंत दिमाखदार व आदर्शवत असा वाढदिवसा निमित्त चा ग्रंथतुला संपन्न झाला.

या कार्यक्रमास भंते पया बोधी,संभाजी कदम ,सावित्रीमाई कदम ,विलास जंगले व्यंकटराव किडे पाटील ,संगमित्रा  सोनकांबळे, अर्चना सोनी, करुणा त्तारु,विद्या पोवळे,अलका गायकवाड,नंदा वाघमारे , शेशेराव वाघमारे ,पी एस गवळी सुदामराव खरतडे, विठ्ठल गायकवाड,भीमराव वाघमारे, सविता बोधनकर, मनीष कावळे, श्रीपती ढोले , कोंडदेव हटकर ,स्वप्नाली काळे ,प्रा.विनोद काळे कांबळे ,भारत इंगोले ,गरड सर , बायस सर ,डी डी भालेराव , दिगंबर कांबले , दिनेश सिंगांकर,जी सिद्धार्थ, रमेश चित्ते, शेख संमदानी, देविदास रगदल, सुधीर साळवे ,किरण मानवतकर ,माधव साळवे ,नीलम कांबळे ,स्वप्निल नरवाघ ,डॉ.भास्कर दवणे बीएम मादळे, प्राचार्य सुरेश घुले ,दिगंबर मोरे ,सुरेश गायकवाड, संजीव उजगरे ,साळवे सर माजलगा , प्रकाश कांबळे,एन डी गवले, दत्ता हरी धोत्रे कल्याणी सर ,माने ,डीपी गायकवाड, i ,शिवराज टोम्पे, अविनाश नाईक आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.


राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाने विधवा व्यवहार प्रथा संपुष्टात आणण्यासाठी व त्यासंदर्भातील समाजातील अनिष्ट रूढी संपुष्टात आणण्यासाठी आदेश काढला आहे. महापुरुषाचे विचार समोर ठेवून इंजि जीवक करुणा रामदास तारू त्यांनी स्वाती धोत्रे या विधवा मुली सोबत लग्न करून खऱ्या अर्थाने राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी प्रत्यक्ष कृतीद्वारे अभिवादन केले. या उभयतांच्या क्रांतिकारी निर्णयाला चे स्वागत करताना दीपक कदम यांनी उपस्थितांसमोर तांचं सत्कार करून त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीस सन्मानित केला .त्यासोबतच अंतर जाति विवाह करणारे कश्यप विद्या मधुसूदन पवळे व नीखिता यांचा सत्कार सुद्धा या प्रसंगी करण्यात आला.


ग्रंथ तुले ला उत्तर देताना दीपक कदम यांनी पुष्पहार किंवा गुच्छ यावर समाजाचा पैसा खर्च न करता तो ग्रंथरूपी भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा अनंत काळापर्यंत लाभ घेता येईल त्यामुळे सामाजिक कार्यक्रमात अनाठाई खर्च न करता ग्रंथरूपी भेट देण्यासाठी चा प्रघात समाजाने पडला पाहिजे म्हणून वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला करून ते ग्रंथ विद्यार्थ्यांना ग्रंथालयांमध्ये आंबेडकरवादी मिशनच्या उपलब्ध करून देण्यात येतील असे या प्रसंगी जाहीर केले.

राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त संपूर्ण देशात शंभर कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक लोकशाही वर्ष म्हणून हे वर्ष आंबेडकरवादी मिशन साजरे करणार आहे. यासोबतच आंबेडकरवादी मिशन हे पंचसूत्री वर विशेषता काम करत आहे अशी माहिती दीपक कदम यांनी दिली यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण ची दिशा देण्याची चळवळ, युवकांमधे संविधानिक चळवळी पेरण्याच्या संदर्भात चे कार्य ,यासोबतच संविधानाचे रक्षण व संविधानिक मूल्यांचे रक्षण ,प्रतिक्रांती रोखण्यासाठी कार्य व सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही प्राप्त करण्याच्या दिशेने कायदेमंडळातील लढाईसाठी तरुण विद्यार्थी युवक व समाजाला तयार करण्याच्या दिशेने आगामी काळात आंबेडकरवादी मिशन कार्य करेल असे याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी