लोहा| आजच्या समाज व्यवस्थेत संस्कारक्षम शिकवणीची गरज आहे.ऑनलाइन अभ्यासाचा दुरुपयोग होताना समोर आले आहे. स्पर्धा प्रचंड आहे त्यात यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार सातत्याने अवाजवी मोबाईल चा वापर हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीत मोठा अडसर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन अभ्यास करावा असे मार्गदर्शन माजी आ रोहिदासराव चव्हाण यांनी केले आहे
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लोहा येथे माजी आ रोहिदासराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या हस्ते प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्गनिहाय प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना माजी आ चव्हाण यांच्या हस्ते गुण पत्रक व बक्षीस देण्यात आले यावेळी हभप आत्माराम महाराज रामेज्वार,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी ई वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना माजी आ रोहिदास चव्हाण म्हणाले की, स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे त्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे अवाजवी मोबाईलचा वापर टाळला पाहिजे संस्करक्षम शिक्षण हेच महत्वाचे आहे असे मार्गदर्शन माजी आ रोहिदास चव्हाण यांनी केले.संचलन आर आर पिठ्ठलवाड तर आभार बालाजी गवाले यांनी केले.