नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय गीत गायल्यानंतर उपस्थितांना कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, आंतर विध्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम माने, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्र-संचालक डॉ. अर्जुन भोसले, विद्यार्थी विकास विभागाचे प्र-संचालक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांच्या समवेत विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.