हिमायतनगर, अनिल मादसवार| शांती एकता भाईचार्याची शिकवण देणारा रमजानच्या महिन्यात सर मुस्लिम समाज बांधव उपवास करून अल्लाकडे दुवा मागतात. रमजान ईदचा उत्सव काही दिवसावर आला असून, ईद साजरी करताना हिंदू - मुस्लिम भाई - भाई व एकतेचा संदेश कायम ठेवावा. तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडता आनंदाने ईद साजरे व्हावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले.
ते रमजान महिन्यातील दि.३० एप्रिल शनिवारी दरवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिमायतनगर येथील दारुल उल्लूम मस्जिदमधील इफ्तार पार्टी प्रसंगी बोलत होते. यावेळी कृउबाचे माजी संचालक शे.रफिक सेठ, डॉ.राजेंद्र वानखेडे, गजानन तुप्तेवार, राजीव बंडेवार, संतोष पळशीकर, गौतमचंद पिंचा, आशिष सकवान, सतीश मामीडवार, प्रवीण कोमावार, संतोष शिंदे, राजू पाटील पारवेकर, सुभाष माने, अन्वर खान, जावेद कुरेशी, शे.गणि शे.सलीम, अश्रफ भाई, फेरोज खान पठाण, फेरोज कुरेशी, असद मौलाना, शकील भाई, मनानं भाई, आदींसह सर्व धर्मीय नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक भगवान कांबळे म्हणाले कि, सध्या सर्वत्र अफवांचे पेव पसरत आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊं नये. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्य विधान, मेसेज फरवर्ड करू नये, जेणे करून जातीय सलोखा बिघडेल. असे मेसेज दिसली तरी ती डिलीट करून शांतता व सुव्यवस्था पाळावी. आणि हिंदू मुस्लिम बांधवानी हिमायतनगर शहराची शांततेची परंपरा कायम ठेऊन सण - उत्सव साजरे करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. इफ्तार पार्टीसाठी कुलकर्णी, सिंगणवाड, नागरगोजे व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.