सावरमाळ शिवारातील खुन प्रकरणाचा स.पो‌‌.नि.संग्राम जाधवांनी लावला छडा -NNL

सावरमाळ शिवारात झालेल्या अज्ञात महिलेच्या खुन प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी केले गजाआड


मुखेड, रणजित जामखेडकर।
दि.१५ मे रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास सावरमाळ शिवरातील खाज्यामियाँ मेहबूबसाब पिंजारी यांच्या शेतातील आखाड्यावर एका अज्ञात महिलेची सडलेल्या अवस्थेतील प्रेत आहे अशी माहिती सावरमाळचे पोलीस पाटील यांनी दिले वरून अमृ क्रमांक ०८/२०२२ हि दाखल होती व सदर तपास सपोनि संग्राम जाधव हे करीत होते. 

सदर घटनेच्या तपासामध्ये सदर मयत महिला ही मौजे बेटमोगरा ता.मुखेड जि. नांदेड येथील प्रेमला उर्फ इंदर बापूराव भेंडेगावकर ही असल्याचे समजले सदर मयताच्या नातेवाईकांकडे तपास केला असता, मयत यांची मोठी बहीण नाव चंदर व इतर नातेवाईक यांनी मयताच्या अंगावरील जप्त करण्यात आलेले कपडे, चप्पल, मोबाईलचे चार्जर व दागिने पाहून मयत ही त्यांची बहीण असल्याचे सांगितले. त्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. जगदीश गायकवाड यांच्या कडून provisional cause of Death घेतले असता त्यांनी brobable cause of Death is head injury असा अहवाल दिला त्या आधारे मयताची बहीण चंदरबाई हिने अज्ञात वेक्ती विरुद्ध दिलेल्या फर्यादीवरून अज्ञात वेक्ती विरुद्ध  गु. र. न. १२०/२०२२ कलम ३०२ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

नमूद गुन्हाच्या तपास पोलिस उप.निरक्षक गजानन कागणे हे करीत होते. गुन्ह्यांची गंभीर्यानी दाखल घेऊन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम जाधव , पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे यांच्या सह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गजानन कागणे यांनी तात्काळ तपासणीचे चक्र फिरवून गोपनीय माहिती हस्तगत करत गुन्हा दाखल झाल्यापासून ३ दिवसाच्या आत नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे १) शंकर यशवंत खपाटे वय ३६ वर्ष  २) श्रीराम उद्धव पिटलेवाड वय ३१ वर्ष दोघे रा. बेटमोगरा ता. मुखेड जि. नांदेड त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीताने गुन्हा केल्याचे कबूल केले.

 सदर आरोपीतांनी त्यांच्या सोबत असलेले अनैतिक संबध व त्यांच्यात झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वरून वाद होऊन आरोपी शंकर खपाटे यांनी त्याचा मित्र श्रीराम पिटलेवाड यांनी मयत प्रेमला उर्फ इंदरबाई यांना बेटमोगरा येथून सावरमाळ शिवारात आणुन दगडाने डोक्यात मारून तिचा खून केला असल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यातील तपासात मुक्रामाबाद पो.स्टे.येथील पो.हे.कॉ. पठाण, पो.हे कॉ. सुरनर, पो.ना.मरगेवाड,पो.कॉ.तग्याळकर (राईटर ), म.पो.कॉ. पांचाळ, चालक, ASI गायकवाड, पो.कॉ.पठाण यांनी गुन्ह्याचे तपासात आरोपी शोध घेऊन आरोपींना अटक केली आहे.

या उल्लेखनीय कामगिरी बद्धल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुक्रामाबादचे पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या सह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.मुक्रमाबाद पोलिसांची अशाच प्रकारची दुसऱ्या कामगिरीमुळे पोलीस ठाणे मुक्रमाबाद परिसरातील नागरिकांनी समाधान वेक्त केले असून,सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे विविध स्तरातुन कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी