उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील मौजे वडगाव येथील रहिवासी व उस्माननगर येथील जि.प.के.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा वडगाव पंचक्रोशीत सामान्य माणसाच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होऊन जनसामान्याशी आपली नाळ कायम ठेवणारे मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांच्या मातोश्री कै.सुभद्राबाई संभाजीराव काळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दि.३ मे रोज मंगळवारी सकाळी १० वा. द.भ.प.रुद्रगिर मठ संस्थान किवळा यांचे किर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून सौ.सोनालीताई शंकरराव ढगे ( माजी सभापती लोहा ) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.डाॅ.गोविंद नांदेडे ( पूर्व शिक्षण संचालक, महाराष्ट्र) मा.शिवाजीराव कपाळे ( से.नि.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी) देविदासराव बस्वदे. ( प्रदेशाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ) सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर ( भाजपा प्रदेशाउपाध्यक्षा तथा जि.प.सदस्य नांदेड) मा.दिलीपदादा धोडगे , अविनाश शंकरराव पाटील पानपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत राहाणार आहेत.
तरी परिसरातील नागरिकांनी किर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संभाजीराव पाटील काळे ,सौ.अनुसयाबाई रामराव मोरे , देविदास पाटील काळे , जयवंतराव पाटील काळे, माधवराव पाटील काळे, शिवाजी पाटील काळे,प्रकाश पाटील काळे, यांच्यासह समस्त परिवार यांनी केले आहे.