नविन नांदेड। भायेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गोविंदराव नारायण कोल्हे,तर व्हाईस चेअरमन पदी प्रभाकर आंनदराव पुयड यांच्यी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी रा.ग.चरपिलवार यांनी ९ मे रोजी केली निवडीनंतर गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये स्वागत करून अभिनंदन केले.
सेवा सहकारी सोसायटीच्या २०२२ ते २७ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आल्यानंतर नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख आंनदराव पाटील बोढारकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व गावातील प्रतिष्ठित नागरीक व संरपच,ऊपसंरपच यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.
संचालक मंडळ चा एकुण १३ जागा पैकी ११ जागेसाठी संचालक मंडळ बिनविरोध निवड २१ एप्रिल रोजी निवड झाली त्या नंतर चेअरमन निवडीसाठी ९ मे रोजी निवडणूक अधिकारी रा.ग. चरपिलवार, व साहयक निवडणूक अधिकारी तथा सचिव एन.सि.कोटूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय भायेगाव येथे घेण्यात आली या वेळी चेअरमन म्हणून गोविंदराव कोल्हे,व्हाइस चेअरमन प्रभाकर आंनदराव पुयड, यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी संचालक मंडळ बापुराव कोचार, गुलाबराव कोल्हे,प्रभु कोल्हे, सुरेश खोसडे, बालाजी पुयड,साहेब पुयड, भिमराव भालेराव,गंगाबाई खोसडे, लक्ष्मी बाई पुयड ऊपसिथीत होते.
संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, ऊपसंरपच बालाजी कोल्हे, अशोक पाटील कोचार, विठ्ठलराव खोसडे,रामराव कोल्हे, आंनदा मेकाले,गौतम भालेराव,तिरमुख कोल्हे, विश्वनाथ कोल्हे,ऊतम कोल्हे,जिवनाजी पुयड, शिवाजी खोसडे,शंकर खोसडे गणपती कोचार ,देवराव कोल्हे, अवधुत मनुरे व गावकरी यांच्यी उपस्थिती होती.निवडी नंतर फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये स्वागत करून गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे मिठाई वाटप करून या निवडीचा जल्लोष व्यक्त केला.