नविन नांदेड। तुप्पा सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन गोविंदराव चितळे तर व्हाईस चेअरमन पदी रामराव कदम यांच्यी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी रा.ग.चरपिलवार यांनी दि.९ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या संचालक मंडळ बैठकीत केले, यावेळी नवनिर्वाचित संचालक सह प्रतिष्ठीत नागरिक,संरपच ऊपसंरपच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यी उपस्थिती होती,निवडी नंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांच्ये अभिनंदन करून स्वागत करण्यात आले.
तुप्पा सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूक २०२२ ते २७ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्या नंतर शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र वापस घेण्यासाठी १३ जागेसाठी एक एक अर्ज आल्याने संचालक मंडळ बिनविरोध निवड करण्यात आली होती. संचालक मंडळ बिनविरोध निवड २५ एप्रिल झाल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांचा निवडीसाठी ९ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक अधिकारी रा.ग. चरपलिवार, तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिव एन.सी.कोटूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदी गोविंदराव चितळे, व्हाईस चेअरमन पदी रामराव कदम यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली ,या वेळी संचालक मंडळ एकनाथ कदम,भिमराव कदम, देवराव टिपरसे, मारोती पवार,सुधाकर पवार,विनायक बिरकले,किशन पंडित, चंद्रकला बाई कदम, शारदाबाई कदम, सुदर्शन नरवाडे,आंनदा ढेपाळे
यांच्या सह पंचायत समिती सदस्य गंगाधर नरवाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम, माजी संरपच शिवकांत कदम संरपच प्रतिनिधी मंदाकिनी यन्नावार, ऊपसंरपच प्रतिनिधी दता कदम, माजी संरपच व्यंकटराव चितळे, महाजन कदम, बापुराव पवार,अनिल चितळे,
चिमणाजी कदम, गुलाब कदम, बबनराव कदम, ज्ञानेशवर यन्नावार, संजय टिपरसे, विठ्ठल टिपरसे,मनोहर कदम,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरीक, ग्रामपंचायत सदस्य,व गावकरी ऊपसिथीत होते. चेअरमन गोविंदराव नारायण चितळे हे गेल्या तिस वर्षांपासून चेअरमन असल्याने व सेवा सोसायटी माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल पुन्हा पाच वर्षांसाठी नुतून संचालक मंडळ यांनी चेअरमन पदी निवड केली.