बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक व्हा ; आपल्या मुलांना अधिकारी बनवा - राहुल लोहबंदे -NNL

कवी चंदनशिवे यांच्या काव्य मैफल व गायक कुणाल वराळे यांच्या भीमगीतास उत्स्फूर्त प्रतिसाद 


मुखेड, रणजित जामखेडकर।
महापुरूषांचे जन्मोत्सव फक्त डिजेच्या तालावर जल्लोष करण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी दिलेल्या विचारावर चालले पाहिजे, बाबासाहेबांच्या अनुयायांनी महापुरुषांच्या विचाराचे पाईक व्हावे, फुले- आंबेडकर जयंती निमित्त संकल्प करुया की आमच्या पाल्यांना आम्ही अधिकारी बनवणार, ही खऱ्या अर्थाने महापुरूषांना अभिवादन असेल असे मत प्रास्तविकेत कार्यक्रमाचे आयोजक युवा नेतृत्व राहुल लोहबंदे यांनी व्यक्त केले. 

 क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती निमित्त दंगलकार नितीन चंदनशिवे यांची विद्रोही काव्य मैफल व प्रसिद्ध गायक कुणाल वराळे यांचा भीम गितांच्या कार्यक्रमास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. 


दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी फुलेनगर येथील मैदानात हजारो लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर, उद्घाटक माजी आ.अविनाशराव घाटे, विशेष अतिथी रामदास पाटील सुमठाणकर, स्वागताध्यक्ष जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, सदाशिवराव पा.जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव, डाॅ.रामराव श्रीरामे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष बोनलेवाड, ज्ञानेश्वर पा.डुमणे, डॉ.रणजित काळे, नंदकुमार मडगुलवार, शरद कोडगीरे, बापुराव कांबळे , श्रावण नरबागे यांच्या सह मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे म्हणाले की, मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा कवितेचा हमाल आहे. " सारे ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चुक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला, आणि मी माणूस झालो . " धार्मिक रंगाविषयी ते म्हणाले की,

" दिवाळीला घर रंगवताना 

रंगांचीच फार भिती वाटली मला,

लोकं हल्ली घराचा रंग बघून

माणसाची जात ठरवतात

म्हणून मी सगळं घरच पांढरशुभ्र केलं 

मी जातीला चुना लावला 

आणि मी माणसात आलो. " 

याचबरोबर चंदनशिवे यांनी आंबेडकर नगर, कांबळे, पांडुरंग आदी कविता सादर करुन उपस्थितीत मंत्रमुग्ध केले. कवी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाने मान्यवरांसह उपस्थित जनता प्रभावित झाली. यावेळी माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाशराव घाटे, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार रियाज शेख व गंगाधर सोंडारे यांनी केले तर आभार अनिल बनसोडे यांनी मानले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिकेत कांबळे, विजय लोहबंदे, आशितोष कांबळे, साजित भाई, गौतम गवळे, सुरेंद्र भद्रे, संतोष गोणारकर, विशाल गायकवाड, रऊफ मुल्ला, मदार दफेदार, अंतेश्वर कांबळे, परमेश्वर कांबळे, शेख समीर, शेख सोहेल आदींनी प्रयत्न केले. कवी चंदनशिवे यांच्या काव्य मैफलीस व गायक कुणाल वराले यांच्या भीमगीतास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी