मुखेड, रणजित जामखेडकर। मुक्रमाबाद येथील ईदगाह मैदानावरती मंगळवारी मुप्ती मोहम्मद जलील साहब कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लीम बांधवानी रमजान ईद (ईद- उल- फितर-)ची सामूहिक नमाज अदा केली.नमाज झाल्यानंतर गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले.त्यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
सर्वप्रथम रमजान ईद (ईद- उल- फितर) ची नमाज कशा पद्धतीने अदा करावी यासाठी मुप्ती मोहम्मद जलील कासमी यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर सामूहिक नमाज अदा करुन कुराण पठण करण्यात आले.व देशात एकता व अखंडता टिकून रहावे व शांतता रहावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आले.
यावेळी ईदनिमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधने, उपसरपंच सदाशिव बोयवार, पोलीस पाटील व्यंकट सूवर्णकार, आदिनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
ईदच्या पार्श्वभूमीवर काहि अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शिवाजी आडेकर, गोपनीय शाखेचे यादव इबितवार, दिलीप तग्याळकर, आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट चोख बंदोबस्त ठेवला होता.