अर्धापूर, निळकंठ मदने। तालुक्यातील पार्डी (म) येथील सागवानाच्या लाकडाच्या देवघराला हस्तकलाकुसर आवडल्याने चक्क पुणे येथील बरेच आर्डर मिळाल्याने बाजारपेठेत ही मागणी होत आहे,यामुळे ग्रामीण भागातील कारागीरांना प्रोत्साहन व आर्थिकदृष्ट्या मोबदला मिळत असून,कारागीरांना अच्छे दिन आले आहेत.
आजही खऱ्या कामाला पारख करणारांची कमी नाही,पोटाची खळगी भरण्यासाठी कारागीरांची धाव शहराकडे आहे,कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणानंतर कर्मचारी किंवा अधीकारी, व्यावसायिक झाल्यानंतर लग्न,नवीन घरांचे फर्निचर, दैनंदिन जीवनात लागणारे लाकडी साहित्य हे शहरातून खरेदी करण्याची जणू फॅशनच झाल्याने ग्रामीण भागातील कारागीरांच्या हस्तकलेला किंमत मिळत नसे, परंतू ग्रामीण भागात आजही कारागीरांची हस्तकला प्रसिद्ध आहे.
पार्डी म ता अर्धापूर जिल्हा नांदेड येथील पांडुरंग डोईफोडे व विठ्ठल डोईफोडे यांचे फर्निचरचे दुकान आहे,येथे कारागीरांना काम मिळते,आजही मोठमोठ्या लग्नसमारंभ, वास्तुबांधकाम केलेल्या घरांना दरवाजे,खिडक्या येथून खरेदी करतात,पण येथील पांडुरंग डोईफोडे यांनी केलेले हस्तकलेचे सुंदर देवघराला पुणे येथील बाजारपेठेत मागणी होत असून,दहा ते पंधरा हजारांपर्यंत किंमत मिळत असून, ग्रामीण भागातील कारागीरांना अच्छे दिन आले आहेत, शहरांकडे वळलेल्या ग्राहकांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कलेला पसंती दिल्याने महात्मा गांधी यांनी म्हटलेल्या ' खेड्याकडे चला " या शब्दांची आठवण होत आहे.