मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावे; कामात हलगर्जीपणा करू नये- उपजिल्हाधिकारी मंडलिक -NNL


लोहा।
लोहा कंधार या दोन्ही तालुक्यात मान्सून पूर्व कामाचा आढावा उपविभागीय दंडाधिकारी डॉ  शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पावसाळ्यापूर्वी जी आवश्यक कामे आहेत ती पूर्ण करावीत सर्व विभागाने आपापली जबाबदारी व्यवस्थिपणे पार पाडावी.कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल असे उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी केले.

कंधार उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात  आली यावेळी लोहा व कंधारचे तहसीलदार - कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी व्यंकटेश मुंडे, लोहा बीडीओ शैलेश वाव्हूळे, डेप्युटी इंजिनिअर मोहन पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ एम आर पुरी, ऊर्ध्व मानार प्रकल्पाचे इजि  विनायक देसाई, मृदसंधारण उपविभाग कंधार चे आर एम मूळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गुजलवार, कंधार नायब तहसीलदार कामठेकर, महसूल सहायक गोविंद पटणे राम पांचाळ( लिपीक कंधार ) यासह विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी आरंभी तालुक्याचा आढावा घेतला. 

शहरात व गावातील  नाली साफसफाई करून घ्याव्यात ,तलाव बाबत आवश्यक त्या सूचना तसेच ,एम एस ई बी ने पोल व लाईट बाबत सूचना दिल्या ,लिबोटी धरण बाबत आढावा घेतला. रस्‍ते  तसेच गावोगावी जाऊन लोकांना पूर तसेच अतिवृष्टीत घ्यावयाच्या उपाययोजना बाबत जनजागृती इतर आवश्‍यक आहे. या सूचना त्यांनी दिल्या यात तहसीलदार मुंडे तसेच इतर अधिकारी यांच्या उपयुक्त सूचना यावरही   चर्चा करण्‍यात आली उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक यांनी सर्व विभाग प्रमुख याना मान्सूनपूर्व कामाच्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन केले.

●मुख्याधिकारी व तालुका कृषी अधिकारी अनुउपस्थित●

लोहा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात प्लॉटिंग तसेच संरक्षक भिंती बांधण्यात आली याकडे तहसीलदार यांचे लक्ष वेधण्यात आले आहे तसेच जुन्या शहरात कलालपेठ भागातून असणारी नदी किरोडा, गोलेगाव या भागातून वाहत येते ती सुनेगाव तलावात मिसळते  या नदीला मोठा पूर येतो कलालपेठ, साठे गल्ली येथे घरात पाणी शिरते त्या नदीचे पात्र खोल व रुंद करणे आवश्यक असतानाही वर्षानुवर्षे नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे शहरात प्रश्न ज्वलंत असतानाही मुख्याधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित नव्हते तसेच तालुका आरोग्य अधिकारी हेही उपस्थित नव्हते .उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक यांनी याची नोंद घेतली असून जे जे बैठकीस गैरहजर होते असा विभाग प्रमुखांना कारण दाखवा बजावले जाणार  आहे असे  तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागातुन सांगण्यात आले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी