अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त पदी डॉ. रईसोधदीन खाजा अहमोधदीन -NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त पदी डॉ.रईसोधदीन खाजा अहमोधदीन यांच्यी नियुक्ती डॉ.सुनिल लहाने यांनी ९ मे रोजी काढले असून त्यांनी १० मे रोजी पदभार स्वीकारला आहे.

 सिडको क्षेत्रीय कार्यालय चे सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे हे नियमित वयोतमाना नुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले या वेळेस त्यांच्या ठिकाणी ईतर सहाय्यक आयुक्त यांच्यी नियुक्ती किंवा तात्पुरता पदभार मनपा प्रशासनाने देणे गरजेचे होते व त्यातच येथील सहाय्यक आयुक्त घेण्यासाठी जणु स्पर्धा लागली होती. पंरतु गेल्या आठ ते दहा दिवसांपासून  सहाय्यक आयुक्त पद रिक्त व पदभार नसल्याने नागरीकांच्यी अनेक कामे रेगांळली होती या बाबत नांदेड न्यूज लाईव्हने बातमी प्रसिद्ध केली होती.

 अखेर आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.रईसोधदीन यांच्यी नियुक्ती केली व त्यांनी आपला पदभार १० मे रोजी स्विकारला आहे, यावेळी सहाय्यक आयुक्त रावण व सोनसळे, राजेश चौहाण, रमेश चावरे, कार्यालयीन अधिक्षक विलास गजभारे यांच्यी उपस्थिती होती.

नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,व छायाचित्रकार सांरग नेरलकर यांच्या वतीने नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्ये स्वागत करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी