खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल -NNL


कंधार, सचिन मोरे|
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी आरोपी नामे दत्ता विठ्ठल क्षीरसागर वय वर्षे ३० यांची खुणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.यावेळी फिर्यादीची बाजू सरकारी पक्षातर्फे ॲड.श्रीमती पाटील मॅडम तर आरोपीची बाजू ॲड. किशोर क्षीरसागर यांनी मांडली.आरोपी वकिलाच्या युक्तिवादानंतर कंधार अतिरिक्त न्यायालयाने अखेर आरोपीच्या बाजूने ॲड.किशोर क्षीरसागर यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

लोहा तालुक्यातील आडगाव येथील मयत विठ्ठल देविदास क्षीरसागर वय वर्षे ५५ हा दारू पिण्यासाठी नेहमी पत्नी व मुलांसोबत भांडण करत असे. दिनांक १३.१०.२०१७ रोजी रात्री नऊ वाजता मयत विठ्ठल हा दारू पिऊन घरी आला.दारूच्या नशेत स्वयंपाक घरातील खिचडी चे भांडे फेकून देऊन मुलांना शिवीगाळ करू लागला मयताच्या मोठ्या मुलगा रागाच्याभरात चिडलेल्या दत्ताने जळतनासाठी आणलेल्या लाकडाने बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल क्षीरसागर पुन्हा दारू पिण्यासाठी मला दारू द्या म्हनाला तेव्हा त्यास ताक दिले व पुन्हा झोपी गेला रात्री दहा वाजता पोटात दुखू लागल्याने त्यांना लोहा येथे खाजगी दवाखान्यात दिनांक  १५.१०.२०१७ रोजी घेऊन गेला.

आरोपी दत्ता ने घरी फोन केला आणि पप्पाला आधार हॉस्पिटल नांदेड येथे ऑपरेशन ला घेऊन जायचे आहे असे सांगितले. सायंकाळी सातच्या दरम्यान शेजारील बायकांकडून विठ्ठल क्षीरसागर यांचे निधन झाल्याचे त्याच्या पत्नीला समजले त्यानंतर मयताची पत्नी अर्चना विठ्ठल क्षीरसागर हिने मुलगा दत्ताने त्यांच्या वडीलास मारहाण केल्याने मृत्यू झाला अशी फिर्याद हिने पोलीस स्टेशन लोहा येथे दिनांक ०७.११.२०१७  रोजी दिली. आरोपी दत्ता विठ्ठल शिरसागर यांच्या विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली.

गुन्ह्याचा तपास ए.पी.आय. पाटील यांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.सलगर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.त्याची पत्नी अर्चना तसेच त्यांचा दुसरा मुलगा दिगंबर यांची साक्ष झाली. त्याची पत्नी व मुलगा यांनी उलट तपासामध्ये विठ्ठल क्षीरसागर हा दारू पिऊन गावातील लोकांसोबत भांडण करीत असे,त्यामुळे त्यास मारहाण होत असे आरोपी दत्ता यांनी काठीने मारल्याचे साक्षीदारांनी सांगितले नाही. तसेच जप्त केलेले लाकुड निवेदन पंचनामाप्रमाणे सिद्ध झाले नाही.डॉक्टरांच्या साक्षीमध्ये मयत विठ्ठल क्षीरसागर  यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असे सांगितले. 

आरोपीच्या वतीने ॲड.किशोर क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला मयताचा मृत्यू मारहाणीमुळे झालेला असला तरी आरोपीने मारहाण केली हे सरकार पक्ष सिद्ध करू शकले नाही.तसेच फिर्याद दाखल करण्यास २३ दिवस उशीर झाला,मयताचा खून करण्याचा हेतू सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध सिद्ध केला नाही.केवळ शवविच्छेदनाच्या रिपोर्टमुळे पोलिसांनी मयताच्या पत्नीकडून फिर्याद घेऊन आरोपी दत्ता विठ्ठल क्षीरसागर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून दोषारोपपत्र दाखल केले.सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध संशयापलीकडे गुन्हा सिद्ध  केलला नाही.सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सलगर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी