नविन नांदेड। श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग 2022 निमित्त "योग व आरोग्य" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले .
सदरील कार्यक्रम कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. डब्ल्यू .आर. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक डॉ. संतोष जटाळे होमिओ पॅथिक तज्ञ यांनी योग व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आरोग्याकडे ही लक्ष द्यावे तसेच ते पुढे म्हणाले की आपले अन्न हेच आपली औषधी आहे. योगा विषयात पतंजली यांचे मोठे योगदान आहे.
आपण रोज योगा केला नाही तर भविष्यात आपणाला अनेक रोगांना सामोरे जावे लागते निरोगी जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने आपणास दिलेला आहे. मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य जोपासण्यासाठी व ताण तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा आवश्यक आहे. यात त्यांनी भुजंगासन, ताडासन, शीर्षासन, सूर्यनमस्कार आदींची माहिती दिली. पोषक आहाराचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर निरंजन कौर सरदार ह्या होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप काठोडे रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ.मनीषा मांजरमकर ,प्रा. डॉ. विद्याधर रेड्डी, प्रा. डॉ.प्रतिभा लोखंडे ,प्रा.डॉ. रावसाहेब दोरवे ,प्रा.डॉ. सत्वशीला वरघंटे, प्रा.डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. सुनील गोईनवाड आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वंभर रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन पियुष राठोड यांनी केले, सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्नेहल सरोदे, राहुल जाधव, हनुमान ढगे, सृष्टी पांचाळ,जनार्धन मैठे ,पवन राठोड आदींनी परिश्रम घेतले.